डोंबिवलीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला २० वर्षांचा कारावास

मुंबई तक

14 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

डोंबिवलीतल्या पूर्व भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहत असलेल्या एका तरुणाला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. आस्टूरकर यांनी २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरणा न केल्यास आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले. डोंबिवली: क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शारिरीक अत्याचार केल्याचं […]

Mumbaitak
follow google news

डोंबिवलीतल्या पूर्व भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या राहत असलेल्या एका तरुणाला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. आस्टूरकर यांनी २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरणा न केल्यास आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले.

हे वाचलं का?

डोंबिवली: क्रीडा प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, शारिरीक अत्याचार केल्याचं उघड

सात वर्षापूर्वी बलात्काराची ही घटना डोंबिवलीत घड़ला होता. या प्रकरणात अटक झाल्यापासून आरोपी आधारवाडी तुरुंगात होता. या तरुणाच्या कृत्याबद्दल न्यायालयाने तीव्र खेद व्यक्त करत आरोपीला २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. शंकर उर्फ राहुल वसंत पेटकर अशी कारावासाची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

बलात्काराच्या या प्रकरणात सरकारी वकील ॲड. कदंबिनी खंडागळे यांनी पीडित मुलीची बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गंधास यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपपत्र कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केले होते.

काय घडली होती घटना?

पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेल्या आपल्या घरा जवळील सार्वजनिक ठिकाणच्या नळ कोंडाळ्यावर पाणी भरण्यासाठी गेली होती. पाणी पुरवठा नळावर मुलगी एकटीच होती. नळ कोंडाळ्याच्या बाजूला आरोपी राहुलचे घर होते. नळावर कोणीही नाही आणि आपल्या घरात कोणीही नाही असा विचार करून राहुलने पीडित मुलीवर बलात्कार करण्याचे ठरवलं.

राहुलने पीडित मुलीला घरात आली तर बिस्किट देतो असे आमीष दाखविले. पीडित मुलगी आरोपी राहुलला मामा टोपण नावाने हाक मारायची. राहुलच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मुलगी राहुलच्या घरात गेली. तेथे पीडित मुलीला काही कळण्याच्या आत राहुलने मुलीवर बलात्कार केला. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरली. हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणून राहुलने पीडितेला दमदाटी केली.

डोंबिवलीत चाललंय काय? इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढवली, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक

राहुलने केलेल्या प्रकाराबद्दल अस्वस्थ असलेल्या मुलीने घरी आल्यानंतर आई, वडिलांना घडला प्रकार सांगितला. ते हा प्रकार ऐकून हादरले. पालकांनी मुलीला तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात राहुल विरुध्द तक्रार नोंदविण्यासाठी नेले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून राहुल विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायदा, बलात्कार कायद्याने गुन्हा दाखल केला होता. या घटनास आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सात वर्षापासून न्यायालयात हा दावा सुरू होता.

    follow whatsapp