राज ठाकरेंचं भाषण राज्याची शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक, AAP कडून कारवाईची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचे पडसाद तात्काळ उमटायला सुरुवात झाली आहे. 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजेत नाहीतर 4 तारखेपासून मी ऐकणार नाही असं म्हणत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. परंतू आम आदमी पक्षाने आता राज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राज ठाकरे यांचं भाषण […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:13 PM • 01 May 2022

follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचे पडसाद तात्काळ उमटायला सुरुवात झाली आहे. 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजेत नाहीतर 4 तारखेपासून मी ऐकणार नाही असं म्हणत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. परंतू आम आदमी पक्षाने आता राज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरे यांचं भाषण हे राज्याची शांतता आणि सुरक्षेला थेट धोका पोहचवणारं आहे. यासाठी राज ठाकरेंवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी केली आहे.

राज ठाकरेंचं भाषण अखेरच्या टप्प्यात आलेलं असताना औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानाजवळ असलेल्या मशिदीवरुन अजानाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज यांचा पारा चढलेला पहायला मिळाला. सभेला उपस्थित पोलिसांना राज यांनी आव्हान करत यांच्या तोंडात बोळे कोंबा आणि तात्काळ अजान बंद करा अशी मागणी केली. ज्यानंतर उपस्थित समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झालेली पहायला मिळाली.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी – औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंचा घणाघात

यांना जर सरळ भाषेत कळत नसेल तर मी म्हणतो एकदा काय ते होऊन जाऊ द्या…महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ. माझी सर्व देशवासियांना विनंती आहे की मागचा पुढचा विचार न करता भोंगे हे उतरवलेच पाहिजेत. जर ते उतरले नाहीतर तर त्यासमोर हनुमान चालीसा लावा. अभी नही तो कभी नही, राज ठाकरेंच्या या आव्हानानंतर उपस्थित समर्थकांमध्ये वेगळाच उत्साह संचारलेला पहायला मिळाला.

औरंगाबादच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी राज ठाकरेंना 16 अटी घालून दिल्या होत्या. ज्यात सभेतून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं प्रक्षोभक वक्तव्य करु नये या अटीचाही समावेश होता. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या मागणीनंतर पोलीस आता यावर काय कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भर सभेत ‘मुंबई Tak’ची मुलाखत दाखवत राज ठाकरेंची पवारांवर तुफान टीका

    follow whatsapp