Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये हाडं गोठवणारा गारठा, हवामान खात्याचा अलर्ट

Maharashtra weather : राज्यात 9 जानेवारी रोजी हवामान विभागाकडून कोरडं वातावरण राहिल असा अंदाज वर्तवला होता. तसेच थंडीचा जोर कायम राहिल, विशेष रात्री आणि सकाळी कमी तापमान जाणवेल.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 09 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाकडून कोरडं वातावरण राहिल असा अंदाज

point

'या' विभागात ढगाळ वातावरणाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात 9 जानेवारी रोजी हवामान विभागाकडून कोरडं वातावरण राहिल असा अंदाज वर्तवला होता. तसेच थंडीचा जोर कायम राहिल, विशेष रात्री आणि सकाळी कमी तापमान जाणवेल, उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय राहतील, ज्यामुले विदर्भ आणि मराठवाड्यात गारठा अधिक अनुभवास येईल. तसेच कोकण विभागात समुद्रामुळे तापमान तुलनेनं मध्यम राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूर महापालिका निवडणूक इतिहास 2017 : महापालिकेवर भाजपचा दणदणीत विजय, 2025-26 मध्ये काय होणार?

कोकण : 

कोकण विभागातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच याच एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ढगाळ वातावरण, तसेच धुक्याची शक्यता आहे. तसेच सकाळी दाट धुके पडण्याची दाट शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर पसरणार आहे. तसेच याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 28 ते 30 अंश सेल्सिअस तर किमान 12 ते 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर सकाळी आणि रात्री अधिक जाणवेल.

मराठवाडा :

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड परभणी या जिल्ह्यांचा समावेश होतो. याच एकूण विभागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुके आणि रात्री गारठा जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हे ही वाचा : अरुण गवळीच्या दोन्ही मुलींकडे कायच्या काय प्रॉपर्टी! एका लेकीचं झालंय MA; पण दुसरी दहावी पास!

विदर्भ :

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता असून, वातावरण कोरडं राहील.

    follow whatsapp