Indian Army Recruitment 2026: इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांसाठी मोठ्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन आर्मीकडून (SSC Tech 67th) शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
आर्मी टेक्निकलच्या या नव्या भरतीमध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन्स जाहीर करण्यात आले असून अर्ज करण्याची तारीख सुद्धा महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी वेगवेगळी असणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुष उमेदवार 7 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, महिला उमेदवारांना 6 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 हा अर्ज करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत, सिव्हिल, आर्किटेक्ट, कंप्यूटर सायन्स, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल अशा विविध इंजीनिअरिंग क्षेत्रात पुरुषांची भरती केली जाणार आहे. अशातच, अर्जदारांकडे संबंधित किंवा समकक्ष क्षेत्रात इंजीनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, महिलांसाठी सुद्धा इंजीनिअरिंगची डिग्री असणं अनिवार्य असणार आहे.
हे ही वाचा: धाराशिव : दारू पाजून डोळ्यात लाल तिखट... अनैतिक संबंध टिकवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
वयोमर्यादा
SSC Tech (एसएससी टेक) महिला आणि SSC Tech (एसएससी टेक) पुरुष पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी 20 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 1 ऑक्टोबर 1999 आणि 30 सप्टेंबर 2006 या तारखा लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग, एसएसबी, PCTA, मेडिकल या टप्प्यांतून उमेदवारांची निवड केली जाईल. यासोबतच, उमेदवारांना कोणत्याच प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
किती मिळेल पगार?
नियुक्तीनंतर, उमेदवारांना ट्रेनिंगच्या कालावधीत दरमहा 56,000 रुपये वेतन दिलं जाईल. तसेच, लेफ्टनंट पदावर उमेदवारांना जवळपास 17 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळतं.
हे ही वाचा: मोठी बातमी : संजय राऊत समोर दिसले, एकनाथ शिंदेंचा नमस्कार,दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम joinindianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. त्यानंतर, होमपेजवर Officer Entry Appln/Login या लिंकवर क्लिक करा.
3. आता, रजिस्टर्ड नसल्यास उमेदवारांनी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करा.
5. नंतर, Apply Online सेक्शनमध्ये जाऊन शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल कोर्सच्या लिंकवर क्लिक करा.
6. यानंतर, अर्जात सर्व आवश्यक माहिती भरा.
7. सर्व डिटेल्स भरल्यानंतर लेटेस्ट फोटोग्राफ आणि सही स्कॅन करून अपलोड करा.
8. शेवटी, भरलेला फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या.
या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात.
ADVERTISEMENT











