Dharashiv Crime: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावात एक अत्यंत धक्कादायक हत्याकांड घडलं आहे. आपल्या भावजयीशी असलेले अनैतिक संबंध उघडकीस येऊ नयेत म्हणून चुलत्या ओमकार देवीदास कांबळे यानं आपल्याच 13 वर्षीय पुतण्या कृष्णा सदानंद कांबळे याचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. खरं तर, मृत तरुण हा आपल्या आई आणि काकाच्या अनैतिक संबंधाची माहिती त्याच्या वडिलांना द्यायचा. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करून 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
आईच्या प्रेमसंबंधाबद्दल वडिलांना सांगायचा...
ही घटना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी शिवारातील एका शेतात घडली. तेथील कदम यांची शेती दत्ता कोरे यांच्याकडे बटाईने होती. उमरगा तालुक्यातील कोळसुर गावातील ओमकार कांबळे हा आपल्या भावजयी ज्योती कांबळे हिच्यासोबत शेतमजूर म्हणून काम करत होता. ज्योतीचा मुलगा कृष्णा हा कधी आपल्या वडील सदानंद कांबळे यांच्याकडे गावी किंवा आईसोबत राहायचा. मात्र, कृष्णाला त्याच्या आई आणि चुलत्याच्या अनैतिक प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती आणि तो ही माहिती वारंवार वडिलांना सांगायचा. यामुळे ओमकारचा प्रचंड संताप होत होता.
हे ही वाचा: पुणे: प्रियकराची अडचण दूर करण्यासाठी तरुणीचा मोठा प्लॅन! काकाच्या बंगल्यात घुसले अन्... प्रकरण थेट पोलिसात
काकाने पुतण्यालाच ठार मारलं
अखेर रागाच्या भरात आरोपीने त्याच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या पुतण्याचा काटा काढायचं ठरवलं. 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारास ओमकारने कृष्णाला तामलवाडी साठवण तलावाजवळील शेतात विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने नेलं. तिथे आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्याने कुऱ्हाडीने कृष्णावर वार करून पुतण्याला ठार मारलं आणि नंतर मृतदेह तलावाकाठच्या गवतात लपवून तो तेथून पसार झाला. 5 जानेवारीला तलावाजवळ गवतात हा मृतदेह आढळून आला.
हे ही वाचा: बीड हादरलं, ट्युशनला जात असलेल्या अल्पवयीन मुलीला कारमधून उचलून नेलं, डोंगरात निर्जनस्थळी बलात्कार
या घटनेनंतर, तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान मृतकाची ओळख कृष्णा कांबळे अशी पटली आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी टेक्निकल पुराव्यांचा आधार घेण्यात आला. पोलिसांनी संशयित ओमकारचा माग काढला आणि उमरगा तालुक्यातील कोळसुर गावातून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेमुळे तामलवाडीसह तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT











