Mumbai News: मुंबईकरांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. एमएमआरसी (MMRCA) ने मेट्रो 3 वर फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केल्याचं वृत्त आहे. ही नवीन अतिरिक्त ट्रेन सेवेची व्यवस्था 5 जानेवारीपासून लागू झाल्याचं सांगितलं जात आहे. एमएमआरसीने सोमवार ते शुक्रवार मेट्रोच्या दैनिक फेऱ्या 265 वरून 292 पर्यंत वाढवल्या आहेत, तसेच शनिवारी एकूण फेऱ्या 209 वरून 236 पर्यंत वाढवल्या आहेत. मात्र, रविवारच्या वेळापत्रकात काहीच बदल करण्यात आलेला नाही. 33.5 किमी लांब असलेल्या या अंडरग्राउंड मेट्रो लाइन-3 मुळे उत्तर मुंबईतील आरे जेव्हीएलआर ते दक्षिण मुंबईतील कफ परेड पर्यंत कनेक्टिव्हिटी मिळते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCA) या निर्णयामुळे मुंबईतील मेट्रो प्रवाशांना चांगला फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी...
MMRCA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाइन-3 प्रवाशांसाठी पूर्णपणे खुली झाल्यानंतर रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी झाला आङे. तसेच. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील वाहतूक कोंडीत जवळपास 30 टक्क्यांनी घट झाल्याचं मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या सर्वेतून समोर आलं आहे. दररोज सुमारे 45 हजार प्रवासी सीएसएमटी आणि आसपासच्या स्थानकांवरून मेट्रो लाइन-3 चा वापर करतात. ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
हे ही वाचा: Govt Job: भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा नाही अन्... काय आहे पात्रता?
मुंबई मेट्रो लाइन 3 (अॅक्वा लाइन) वरील स्थानके
दक्षिण मुंबई: कफ परेड, विधान भवन, चर्चगेट (हुतात्मा चौक), कळंबादेवी, ग्रँट रोड, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, वरळी, आचार्य अत्रे चौक (BKC)
मध्य/ पश्चिम उपनगर: सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी मंदीर, धारावी, विद्यानगरी, सांताक्रूझ, CSMI एअरपोर्ट T1, सहार रोड, CSMI एयरपोर्ट T2, मरोळ नाका, MIDC, SEEPZ, आरे
व्हीआयपी आणि महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश
या कॉरिडोरमध्ये एकूण 27 स्थानके असून यामध्ये बऱ्याच व्हीआयपी आणि महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रोची ही लाइन सिद्धिविनायक मंदिराला देखील कनेक्ट होते. पहिली मेट्रो सकाळी 5:55 वाजता आणि शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता धावते. मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्यामुळे स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, त्यांचा प्रवास सुद्धा सुखकर होण्याची आशा आहे.
ADVERTISEMENT











