Pune News: सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी (7 जानेवारी) दुपारच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरातील एका हॉटेलमध्ये विषारी औषध घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून पीडित उपनिरीक्षकाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
आजाराने ग्रस्त असल्याच्या कारणातून टोकाचं पाऊल
सूरज मराठी (26) अशी आत्महत्या केलेल्या उपनिरीक्षकाची ओळख असून ते 2 वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर वर्षभरापूर्वीच त्यांची सांगलीतील तासगाव पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गुडघ्यांचा आजार होता आणि याच आजाराने ग्रस्त असल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, घटनेनंतर तपास केला असता तशी सुसाइड नोट देखील मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षण गिरीषा निंबाळकर यांनी दिली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता अॅक्वा लाइनवर मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या; प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार गर्दीची चिंताच नाही...
मंगळवारी (6 जानेवारी) सूरज यांनी डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम घेतली आणि तिथे ते मुक्कामी होते. दरम्यान, ते रूममध्ये गेल्यानंतर ती खोली बंदच होती. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा वाजवला मात्र, त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, लगेच हॉटेल चालकाकडून पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कर्माचाऱ्यांनी दुसऱ्या चावीच्या साहाय्याने खोलीचा दरवाजा उघडला.
हे ही वाचा: बीड : मानलेल्या भावास आत्महत्येपासून रोखताना प्राध्यापक मडॅम 80 टक्के भाजल्या, अशा अवस्थेही जबाब दिला
आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाइड नोट
खोलीच्या आत सूरज यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं. पीडित निरीक्षकाने आत्महत्येपूर्वी चिट्ठी देखील लिहिली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून ती सुसाइड नोट ताब्यात घेतली असून त्यात गुडघ्यांच्या आजाराला कंटाळूनच सूरजने स्वत:चं आयुष्य संपवल्याचं लिहिलं होतं. आता, सूरज यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











