हिंगोली : अल्पवयीन मुलीला बिस्कीटाचं आमिष दाखवून विनयभंग, आरोपी फरार

हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा गावात एका नराधमाने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्कीटाचं आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने कनिष्क केदारलिंग कांबळे याच्याविरुद्ध हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील पीडित मुलगी शौचासाठी बाहेर गेली असताना आरोपीने तिला बिस्कीटाचं आमिष दाखवून तिची पँट खेचत विनयभंग […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:13 AM • 23 Mar 2022

follow google news

हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा गावात एका नराधमाने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्कीटाचं आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने कनिष्क केदारलिंग कांबळे याच्याविरुद्ध हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील पीडित मुलगी शौचासाठी बाहेर गेली असताना आरोपीने तिला बिस्कीटाचं आमिष दाखवून तिची पँट खेचत विनयभंग केला. बराच वेळ झाला तरीही मुलगी घरी आली नाही म्हणून आई शोधासाठी बाहेर गेली असता तिला आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आईने आपल्या मुलीकडे धाव घेईपर्यंत आरोपीने तिकडून पळ काढला होता.

क्रुरतेचा कळस ! दोन महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या, ओव्हनमध्ये मिळाला मृतदेह

या घटनेनंतर आईने आपल्या शेजाऱ्यांच्या साथीने हिंगोली पोलीस ठाण्यात या घटनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कनिष्क कांबळेविरुद्ध POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत असून घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर: आयुर्वेद पंचकर्म मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, महिलेला अटक

    follow whatsapp