रामदेव बाबांनी डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने साधला जोरदार निशाणा

सध्या देशात बाबा रामदेव यांच्या अँलोपथी आोषध आणि डॉक्टरांवर केलेल्या वकत्व्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. अनेक डॉकटरांनी बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आता या वादात बॉलिवूडमधील स्टार मंडळींनीही उडी घेतलीय. अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकरने रामदेव बाबांना सोशल मीडियावरून फटकारलं आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट पोस्ट […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:01 AM • 26 May 2021

follow google news

सध्या देशात बाबा रामदेव यांच्या अँलोपथी आोषध आणि डॉक्टरांवर केलेल्या वकत्व्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. अनेक डॉकटरांनी बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आता या वादात बॉलिवूडमधील स्टार मंडळींनीही उडी घेतलीय. अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकरने रामदेव बाबांना सोशल मीडियावरून फटकारलं आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट पोस्ट केलंय. “कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास उभं रहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, क्रोधास्पद आणि घृणास्पद आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली?” असं म्हणत उर्मिलाने रामदेव यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकरनंतर अभिनेत्री तापसी पन्नूनेही रामदेव बाबांवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

दुसरीकडे उर्मिला मातोंडकरच्या पोस्टवर अनेकांनी आपलं समर्थन दर्शवलं आहे. युजर म्हणाला, “उर्मिलाजी तुम्ही बरोबर आहात. हे बनावटी बाबा आहेत.”.आता अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून रामदेव यांनी आपली चूक कबूल केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचं रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असं वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं होतं. त्याला डॉक्टरांच्या ‘ आयएमएने आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधं घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं.मात्र आता समाजातील सर्व स्तरातून होत असलेल्या टीकेमुळे बाबा रामदेव यांच्यासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

    follow whatsapp