अखेर वाघ पिंजऱ्याबाहेर! राऊतांच्या जामीनावर रोहित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई तक

• 09:22 AM • 09 Nov 2022

Rohit Pawar मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. PMLA कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. त्यामुळे जवळपास १०० दिवसांनी ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत. ईडीकडून राऊत यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला होता, मात्र मात्र आज राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता काही वेळात […]

Mumbaitak
follow google news

Rohit Pawar

हे वाचलं का?

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. PMLA कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. त्यामुळे जवळपास १०० दिवसांनी ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत. ईडीकडून राऊत यांच्या जामीनाला विरोध करण्यात आला होता, मात्र मात्र आज राऊत यांना काही वेळापूर्वीच जामीन मिळाला आहे.

त्यानंतर आता काही वेळात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन राऊत तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राऊत यांच्या जामीनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोटात आनंदाचं वातावरण आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की मै झुकुंगा नहीं. मी काहीही झालं तरी झुकणार नाही असं म्हटलं होतं. ते शेवटपर्यंत लढले. आज त्यांच्या भूमिकेचा विजय झाला आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांची बोलकी प्रतिक्रिया :

संजय राऊत यांच्या जामीनावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचीही एक बोलकी प्रतिक्रिया आली आहे. रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट करत याबाबतची प्रतिक्रिया दिली. पवार यांनी एका वाघाचा पिंजऱ्यातून बाहेर येताना व्हिडीओ ट्विट केला असून या व्हिडीओला सत्यमेव जयते! असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या रुपाने वाघ पुन्हा एकदा पिंजऱ्याबाहेर आला असल्याचं पवार यांनी सुचित केलं आहे.

सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं आहे?

सुषमा अंधारे यांनी टायगर इज बॅक असं म्हणत ट्विट केलं आहे.सुषमा अंधारे या शिवसेनेतल्या फायर ब्रांड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आता त्यांची ही प्रतिक्रिया चांगलीच सूचक आहे।

संजय राऊत जेलमध्ये गेल्यानंतर शिवसेनेमध्ये अंधेरीची पोटनिवडणूक, मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी घडल्या. आता या सगळ्या नंतर संजय राऊत यांचं बाहेर येणं महत्त्वाचं मानलं जातं आहे. संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp