ठाकरे गटाला हायकोर्टातून मिळाले शिवाजी पार्क; सुप्रीम कोर्टात जाण्याचे केसरकरांचे संकेत

मुंबई तक

• 12:33 PM • 23 Sep 2022

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई हायकोर्टाकडून ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली. यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे. मात्र हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याचे संकेत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत. काय म्हणाले दीपक […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई हायकोर्टाकडून ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली. यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे. मात्र हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याचे संकेत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले दीपक केसरकर?

दीपक केसरकर म्हणाले, कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करायचा असतो. पण हायकोर्टाच्या वर सुप्रिम कोर्टही असते. त्यामुळे सुप्रिम कोर्टात जायचं की नाही त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही परवानगी शिवसेना म्हणून दिलेली नाही, तर त्यांनी पहिला अर्ज केला होता, सोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची हमी यावर परवानगी दिली आहे.

त्यादिवशी तिथे आरक्षित जागा शिवसेनेचा दसरा मेळावा यासाठी आहे. पण शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या कोर्टात आहे. ती केस चालू आहे. त्यांचा अर्ज पहिल्यांदा होता यावरच त्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आथा पुढे काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे म्हणतं केसरकर यांनी पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टात जाण्याचे संकेत दिले.

मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला विरोध करणारी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिका अशा तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने ठाकरे गटाला परवानगी दिली.

हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारलं!

दोन्ही अर्जांची कल्पना मुंबई महापालिकेला होती. मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचा अहवाल महापालिकेला मिळाला. मात्र, शिवसेनेनं कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली. मात्र, महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला, अशा शब्दात कोर्टाने फटकारलं आहे.

    follow whatsapp