Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचार सुरु केला आहे. पण, प्रचार सुरु होतानाच नको त्याच गोष्टी या निवडणुकीत घडू लागल्या आहेत. वांद्रे पश्चिममधील ज्ञानेश्वरनगरात शिवसेना पक्षाचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर बुधवारी रोजी प्रचार सुरु असतानाच चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सहा वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मृतदेह बॅगेत भरून नाल्यात फेकला, हादरवून टाकणारी घटना
शिवसेनेच्या सलीम कुरेशी उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला
दरम्यान, सलीम कुरेशी हे वॉर्ड क्रमांक 12 मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. या हल्ल्यात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुरेशी यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितलं आहे.
प्रकरणात हल्ल्यामागचं कारण काय?
या प्रकरणात हल्ल्यामागचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुरेशीवरील हल्ला हा राजकी. वैमनस्यातून करण्यात आला की, वैयक्तिक शत्रूत्वातून करण्यात आला याचा तपास सध्या सुरु आहे. या प्रकरणी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी केली असता, हल्लेखोराची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार, 'या' राशीतील लोकांना मिळणार मोठं यश, फक्त 'हे' करा
सलीम कुरेशी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार असल्याचं बोललं जात आहे. तो शिंदेसेनेत येण्यापूर्वी एमआयएम मुंबई सरचिटणीस होते. त्यांच्या विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 143, 147, 148, 149,324,323 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
ADVERTISEMENT











