अजितदादा महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही सगळ्यात फायद्यात-फडणवीस

मुंबई तक

• 04:02 PM • 27 Dec 2021

राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवले. रूग्णालयांमध्ये झालेले मृत्यू, कोरोना, पोलीस दलातील बदल्या या सगळ्यावरून त्यांनी टीका केली. यावेळी अजितदादा सगळ्यात फायद्यात तुम्ही आहात असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवले. रूग्णालयांमध्ये झालेले मृत्यू, कोरोना, पोलीस दलातील बदल्या या सगळ्यावरून त्यांनी टीका केली. यावेळी अजितदादा सगळ्यात फायद्यात तुम्ही आहात असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘अजितदादा या सरकारमध्ये सगळ्यात फायद्यात तुम्ही आहात. कारण जो काही निधी वाटप झाला आहे किंवा वेगवेगळ्या विभागांना जो निधी मिळतोय त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना 2 लाख 50 हजार 388 कोटी मिळालेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. रोज तक्रार करून करून त्यांनी 1 लाख 1 हजार 766 कोटी निधी प्राप्त केला. आमचे शिवसेनावाले बिचारे हात वर करून फसले. आमचे म्हणजे आमचे मित्रच आहेत ना. आमच्यासोबत जास्त काळ राहिले तुमच्यासोबत दोन वर्षे आहेत. ज्यांचे या महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार आहेत त्या शिवसेनेला 54 हजार 343 कोटी असा निधी प्राप्त झाला आहे. सर्वात जास्त निधी मिळालाय तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना त्यामुळे अजितदादा सर्वात फायद्यात आहेत.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदानाला राज्यपालांचा विरोध, ठाकरे सरकारला धक्का

देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अजित पवार आणि इतरांनी या निधीतून कर्मचाऱ्यांचे पगार बाजूला काढा असं सांगितलं. तेव्हा फडणवीस म्हणाले हे बघा मी तेवढा हुशार आहे मला माहित होतं तुम्ही हा मुद्दा काढणार. मी पगाराशिवायही निधी काढले आहेत मी तेपण सांगू शकतो असं फडणवीस हसत म्हणाले तेव्हा सगळे शांत झाले. त्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जुलै ते सप्टेंबर 2020 हा अहवाल आला. महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे. 22 टक्क्यांच्यावर गेला आहे. देशातली सर्वाधिक बेरोजगारी असणारं राज्य हे महाराष्ट्र आहे. तेलंगणा, जम्मू काश्मीर या राज्यांमध्येही बेरोजगारी यापेक्षा कमी आहे. सरकारमधले मंत्री रोजगारयुक्त आणि सामान्य माणसं बेरोजगार अशी स्थिती आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणात अटक, काही वेळात मिळाला जामीन

ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार आणि स्वैराचार चालला आहे तो बंद झाला पाहिजे. एका मंत्र्याने एका कार्यकर्त्याला घरी नेऊन मारणं किती योग्य आहे? पोलिसांनी त्यांना मदत करून सोडवणं किती योग्य आहे? प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून मी नाव घेणार नाही पण हे जे काही चाललंय ते बरोबर नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था कशी ठिक राहिल? असा माझा प्रश्न आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp