Pakistan Army : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. पुलवामा हल्ल्याशी संबंधित युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद यांचा यामध्ये समावेश होता. तसंच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या केंद्रांचंसुद्धा भारतानं नुकसान केलं. यामुळे पाकिस्तान नरमला. रविवारी रात्री उशिरा, पाकिस्तानच्या नौदल, हवाई दल आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचं झालेलं नुकसान कबूल केलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ind vs Pak : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची नांगी ठेचली! 40 सैनिकांना केलं ठार, DGMO काय म्हणाले?
भारताशी झालेल्या या संघर्षामध्ये त्यांचं एक विमान खराब झालं. तसंच, पाकिस्तानने भारताच्या कोणत्याही विमानाचं नुकसान केल्याची माहिती त्यांनी दिली नाही. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले, ही पत्रकार परिषद 'ऑपरेशन बुनियान-उल-मर्सूस' च्या कार्यवाही आणि निष्कर्षांवर आधारित आहे.
पाकिस्तानच्या लष्कराने काय म्हटलं?
लेफ्टनंट चौधरी म्हणाले, 'एका पाकिस्तानी विमानाचं नुकसान झालं आहे. आम्ही त्याबद्दल तपशीलवार माहिती देऊ शकत नाही'. पत्रकार परिषदेदरम्यान, पाक लष्कराच्या प्रवक्त्यांना विचारण्यात आलं की भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे का? त्यावर त्यांनी कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही. अशा सर्व बातम्या सोशल मीडियावर चालणाऱ्या अफवांवर आधारित आहेत असं म्हटलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की त्यांची लष्करी कारवाई 'अचूक, संतुलित आणि संयमी' होती.
पाकिस्तानचा दावा - 26 भारतीय लष्करी तळांवर हल्ला
हे ही वाचा >> CBSE Result 2025 : सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार? 'या' लिंकवर पाहा रिझल्ट, 42 लाख विद्यार्थी..
लेफ्टनंट चौधरी यांनी दावा केला की, भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने 26 भारतीय लष्करी तळांवर हल्ला केला.
सुरतगड, सिरसा, भुज, नालिया, अधमपूर, भटिंडा, बर्नाला, हलवारा, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, उधमपूर, मामुन, अंबाला आणि पठाणकोटमधील भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला. यासोबतच बियास आणि नागरोटामधील ब्रह्मोस क्षेपणास्त्र स्टोरेज सेंटरवरही हल्ला केल्याचं म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये प्रचंड विनाश घडवला
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे खालिद उर्फ अबू आकाशा, मुदस्सर खाद्यान, मोहम्मद रसम खान आणि हाफिज मोहम्मद जमील यांच्यासह 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओच्या विनंतीवरून, भारतानं 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी करण्यास सहमती दर्शविली, पण यापुढे कुठल्याही "दहशतवादी हल्ल्याला युद्ध मानलं जाईल आणि सिंधू पाणीकरार स्थगित राहील" असं स्पष्ट केलं. त्यानंतर आज दोन्ही देशांच्या डीजीएमओ स्तरावरील चर्चा होणार आहे.
ADVERTISEMENT
