पाकिस्तानमध्ये तब्बल 51 ठिकाणी हल्ले, बलोच आर्मीने म्हटलं आता आम्ही...

बीएलएने पाकिस्तानच्या सैन्य आणि गुप्तचर संस्था आयएसआयवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. बीएलएने निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तान हे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि आयएसआयएससारख्या घातक दहशतवादी गटांच्या विकासाचं केंद्र आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

12 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 10:05 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश"

point

बलोचिस्तान लिबरेशन आर्मीचा मोठा दावा

point

पाकिस्तानवर तब्बल 71 हल्ले केल्याचा दावा

BLA attack on Pakistan : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय. शस्त्रसंधीला सहमती दर्शवत दोन्ही देशांनी हल्ले थांबवलेत. मात्र, पाकिस्तानसमोरची आव्हानं काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. कारण आता बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानला इशारा दिला आहे. दक्षिण आशियात "नवीन व्यवस्था आवश्यक झाली आहे" असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय.. त्यांनी परदेशी प्रॉक्सी असल्याचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे येणाऱ्या काळात या गटाने स्वतःला या प्रदेशात एक गतिमान आणि निर्णायक पक्ष म्हणून वर्णन केले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Ind vs Pak : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची नांगी ठेचली! 40 सैनिकांना केलं ठार, DGMO काय म्हणाले?

बीएलएने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर ठिकाणांवर हल्ले केले. कब्जा केलेल्या बलुचिस्तानच्या 51 हून अधिक ठिकाणी 71 हल्ले केल्याची माहिती बीएलएने दिली.

परदेशी प्रॉक्सीचा आरोप फेटाळला

बीएलएने स्पष्ट केलं की, "बलुच राष्ट्रविरोधी किंवा एखाद्या राज्यापूरती मर्यादित शक्ती नाही. बीएलए कोणाचा मोहरा नाही. क्षेत्रीय सैन्य, राजकीय आणि रणनीतिक घडामोडींमध्ये आमचं स्वतःचं स्थान आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेबद्दल पूर्णपणे जागरूक आहोत." 

हे ही वाचा >>"भारतीय पायलट ताब्यात नाही, आमचंच विमान...", पाकिस्तानी लष्कराचा मोठा दावा, 'ते' कबूल केलं

पाकिस्तानवर जोरदार हल्ला करत बीएलएने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. भारताला थेट संबोधित करताना बीएलएने म्हटलं आहे की, "पाकिस्तानकडून शांतता, युद्धविराम आणि बंधुता याबद्दल प्रत्येक गोष्ट हा फसवणूक, युद्धाची रणनीती आणि तात्पुरता डाव आहे."

51 हून अधिक ठिकाणांवर हल्ले

बीएलएने एका प्रसिद्धीपत्रकात दावा केला की, त्यांनी पाकिस्तानी लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलुच म्हणाले, "या आठवड्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान लष्करी तणाव शिगेला होता. बीएलएनेसुद्धा पाकिस्तानी सैन्याविरोधात दंड थोपटलेत. कब्जा केलेल्या बलुचिस्तानात 51 हून अधिक ठिकाणी 71 हल्ले केले, जे अनेक तास चालले." हल्ल्यांमध्ये लष्करी ताफे, गुप्तचर केंद्र आणि खनिज वाहतूकीच्या वाहनांचा समावेश होता. बलुच म्हणाले, "या हल्ल्यांचा उद्देश फक्त शत्रूचा नाश करणं नव्हता, तर भविष्यातील युद्धासाठी सैन्याची तयारी होती. 

पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहनाचा आरोप

बीएलएने पाकिस्तानच्या सैन्य आणि गुप्तचर संस्था आयएसआयवर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप. बीएलएने निवेदनात म्हटलं आहे की, "पाकिस्तान फक्त जागतिक दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचं केंद्र नाही, तर लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि आयएसआयएससारख्या घातक दहशतवादी गटांच्या विकासाचं केंद्र आहे."

    follow whatsapp