पुण्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत पुणे शहराचा कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आला आहे. त्यामुळे सोमवारपासून शहरातले कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे छा-छू काम आहे, Pune Police मुख्यालयातील बांधकामावर Ajit Pawar नाराज
सोमवारपासून शिथील करण्यात येत असलेल्या निर्बंधांनुसार आता शहरातली दुकानं संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. याचसोबत रेस्टॉरंट, हॉटेल १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरीक्त सोमवारपासून शहरात मॉल, अभ्यासिका आणि वाचनालय सुरु करायला परवानगी देण्यात आली आहे. चित्रपट गृह आणि नाट्यगृह मात्र बंदच राहणार असल्याची माहिती पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मॉल सुरु करण्यासाठी नियमावली सोमवारी जाहीर करण्यात येणार आहेत. या बैठकीत अजित पवारांनी आगामी आषाढी एकादशी सोहळ्यासाठी नियमांची घोषणा केली. या बैठकीत पालखी सोहळ्याबद्दही चर्चा झाली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या १० पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे. याचसोबत देहू आणि आळंदी येथून सुरु होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला १०० तर इतर ८ पालखी प्रस्थान सोहळ्याला ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीला यंदाही दोन बस देण्यात येणार असून सर्व नियमांचं पालन करुनच यंदाचा सोहळा आयोजित होईल असं अजित पवारांनी सांगितलं.
असा असेल यंदाचा पालखी सोहळा –
-
पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल
-
इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक
-
काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही
-
रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी
-
प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील
ADVERTISEMENT
