“मी काय म्हातारा झालो आहे का?” शरद पवारांचा कार्यक्रमात मिश्किल प्रश्न

मुंबई तक

24 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:42 AM)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदर तालुका दौऱ्यावर होते. पुरंदर मधल्या परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या, गावोगावी फिरू नका अशी विनंती केली होती. त्यावर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेत तुम्हाला कोणी सांगितलं मी म्हातारा झालोय. तुम्ही काय बघितलं माझं असं […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदर तालुका दौऱ्यावर होते. पुरंदर मधल्या परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात एका कार्यकर्त्यांनी साहेब आपले वय झाले एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या, गावोगावी फिरू नका अशी विनंती केली होती. त्यावर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याचीच फिरकी घेत तुम्हाला कोणी सांगितलं मी म्हातारा झालोय. तुम्ही काय बघितलं माझं असं म्हणतात सभेत एकच हशा पसरला.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले शरद पवार?

मी केंद्रीय मंत्री असताना देशात फळबाग योजना आणली. त्याअंतर्गत फळबाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं. कोकणात गेला तर, काजू आणि हापूसाचे हजारो एकर क्षेत्र आहे. एकेकाळी कोकणाचे लोक १६ वर्षे वय झालं की, मुंबईला कामासाठी जायचे. ६० वय झालं की गावाकडे माघारी यायचे. आज मुंबईला जायची भूमिका कोकणातील लोकांची नाही. फळबाग योजनेतून जास्तीत जास्त आंबा, काजू, फणस कसा लावता येईल, यासाठी प्रयत्न करतात असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी अजून म्हातारा झालोय का?

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परींचे गावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पवारांच्या तब्येतीची काळजी करत साहेबांनी बाहेर फिरु साहेबांनी कुठंही फिरू नये एका जागेवर बसून रिमोट फिरवावा, अशी मागणी एका वयोवृद्ध पदाधिकारी यांनी केली. यावर मी अजून म्हातारा झालो नाही, अशी मिश्किल टिप्पणी पवारांनी केली.

अतिवृष्टीवर उपाय योजनेसाठी सरकार प्रयत्न करत नाहीत

यावेळी पवारांनी म्हटलं की, ‘अतिवृष्टी झाल्यानंतर राज्य सरकार योग्य उपाययोजना करताना करायला पाहिजे ती उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. ज्यांच्या हातात केंद्राची सूत्रे आहेत. ते ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. जेव्हा माझ्याकडे केंद्राची सूत्र आली तेव्हा शेतकऱ्यांची 72 हजार कोटींची कर्ज माफी आम्ही केली. जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी उपयुक्त ठरतील म्हणून मी इथे शेतकऱ्यांसोबत संवाद करण्यासाठी आलो आहे.’

    follow whatsapp