Nana Patole मॅनेज्ड : काँग्रेस उमेदवाराचीच कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई तक

29 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:11 AM)

Dheeraj Lingade Congress Candidate For Amravati Constituency अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना भाजपकडून (BJP) मॅनेज करण्यात आलं आहे. तसंच काँग्रेस (Congress पक्ष बोगस आहे, अशी वक्तव्य असलेली एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीचे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शरद झांबरे-पाटील यांच्याशी संवाद साधताना काँग्रेसचे उमेदवार […]

Mumbaitak
follow google news

Dheeraj Lingade Congress Candidate For Amravati Constituency

हे वाचलं का?

अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना भाजपकडून (BJP) मॅनेज करण्यात आलं आहे. तसंच काँग्रेस (Congress पक्ष बोगस आहे, अशी वक्तव्य असलेली एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीचे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शरद झांबरे-पाटील यांच्याशी संवाद साधताना काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीची हीऑडियो क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. (Amravati Constituency Congress Candidate Dheeraj Lingade viral audio clip about nana patole)

काय आहे या ऑडियो क्लिपमध्ये?

धीरज लिंगाडे आणि शरद झांबरे पाटील या दोघांमधील कथित संवाद पुढीलप्रमाणे आहे.

धीरज लिंगाडे : बोला शरद

शरद झांबरे पाटील : धीरज भाऊ.. काय म्हणता कुठे आहे?

धीरज लिंगाडे : आज तर दिल्लीमध्ये आहे.

शरद झांबरे पाटील : काय होते का काय उमेदवारी?

धीरज लिंगाडे : कळेल आता एक दोन दिवसांत, काय कोणाला जागा सुटते.

शरद झांबरे पाटील : जागा तर काँग्रेससाठी सुटते अशी चर्चा आहे. सुटलेली आहे म्हणून.

धीरज लिंगाडे : हं.. नाही.. नाही. तसं काही नाही अजून. आम्हाला तर फॉर्म भरायला सांगितले आहेत त्यांनी.

शरद झांबरे-पाटील : अच्छा फॉर्मही भरायला सांगितले का? रणजीत पाटील तुमच्या मतदारसंघात आहे, तिकडे बुलढाण्यात. तुमच्या जिल्ह्यात.

धीरज लिंगाडे : आज का?

शरद झांबरे पाटील : हो आज

धीरज लिंगाडे : बर बर..

शरद झांबरे पाटील : चिखलीला वगैरे.

धीरज लिंगाडे : असेल आता त्याला वेळ मिळाला फिरायला.

शरद झांबरे पाटील : हो हो बरोबर आहे.

धीरज लिंगाडे : आणि हे महाविकास आघाडीचं तांगडं असचं असतं दरवेळेसचं.

शरद झांबरे पाटील : हो ना..

धीरज लिंगाडे : आता वेळेवर सुटून ….. होणंही शक्य नाही.

शरद झांबरे पाटील : हां हां बरोबर आहे.

धीरज लिंगाडे : बघूया तरी.. काय काय म्हणते सांगते पार्टी.

शरद झांबरे पाटील : हो ना.. म्हणजे उमेदवारी मिळाली तरच लढणार तुम्ही, नाहीत तर लढणार नाही ना?

धीरज लिंगाडे : हो मी तर तसंच आहे.

शरद झांबरे पाटील : हो ना..

धीरज लिंगाडे : आणि हे काय काँग्रेस साला बोगस आहे पक्ष.

शरद झांबरे पाटील : हो बरोबर आहे.

धीरज लिंगाडे : हे काय फाईट नाही देणार उमेदवार

शरद झांबरे पाटील : नाही कोणी म्हणते सुधीर ढोणेसाठी नाना भाऊला मॅनेज केलं म्हणते रणजीत पाटलांनं, अशी चर्चा आहे.

धीरज लिंगाडे : हो तसंच आहे.

शरद झांबरे पाटील : हो. कारण चित्र दिसूनचं राहिलं. लोकांमध्ये चर्चा आहे, की रणजीत पाटलांनीच त्याला फॉर्म छापून दिले. सगळे फॉर्म याने एकही जमा नाही केला. तुमच्या जिल्ह्यातील बरेच फॉर्म पाठवले असतली त्याला. पण त्याने एकही फॉर्म जमा नाही केला.

धीरज लिंगाडे : नाही नाही.. काहीच नाही केलेलं ना त्याने काम. त्याला इलाज नाही.

शरद झांबरे पाटील : पाहू ना.. मी तर लढणारच आहे अपक्ष. तुम्ही नाही समजा उमेदवारी मिळाली तर मला मदत कराल.

धीरज लिंगाडे : आहे ना आम्ही आता आहोतच.

शरद झांबरे पाटील : चालेल ना..

धीरज लिंगाडे : करुया..

शरद झांबरे पाटील : हो हो..

Mlc election 2023 : जायंट किलर पाटील विरुद्ध लिंगाडे, कुणाचं पारडं जड?

दरम्यान, धीरज लिंगाडे उमेदवारी मिळण्यापूर्वी शिवसेना (UBT) मध्ये होते. १० जानेवारीला रात्री त्यांनी शिवसेना (UBT) पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. त्यापूर्वी काँग्रेसमध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार सुनील देशमुख, मिलिंद चिमोटे, डॉ. सुधीर ढोणे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी ही सर्व नावं मागे पडली आणि लिंगाडेंचं नाव पुढे आलं. मात्र आता लिंगाडे यांची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

MLC Election 2023 : रणजीत पाटलांविरोधात कट्टर समर्थकानेच शड्डू ठोकलाय!

धीरज लिंगाडे काय म्हणाले?

यावर बोलताना धीरज लिंगाडे यांनी मात्र या ऑडियो क्लिपशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हे तर भाजपचे षडयंत्र असून रणजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या जळवचे असल्याने, हे सर्व बदनाम करण्यासाठी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मी ती काल क्लिप ऐकली पण आपला हा आवाज नसून याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp