उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणारे मनोज गरबडे आणि या सगळ्याचं छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची 23 डिसेंबर रोजी हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची माहिती डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे सुकुमार कांबळे यांनी दिली आहे. कांबळे हे सांगलीत पत्रकारांशी बोलत होते, यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर गरबडे आणि त्यांचे सहकांऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पत्रकार म्हणून घटनेचं वार्तांकन करायला गेलेले गोविंद वाकडे यांना देखील ताब्यत घेतलं होतं. मोठ्या विरोधानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. सुरुवातील या सगळ्याचा निषेध संघटनेतर्फे करण्यात आला.
ADVERTISEMENT
यादरम्यान कांबळे म्हणाले, पाटील यांनी अटकेची कारवाई करुन लोकशाहीलाच आव्हान दिले आहे. महापुरुषांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करुन मानसिकता स्पष्ट केली आहे. शाई फेकून निषेध करणारे मनोज गरबडे यांचे अभिनंदन आम्ही करणार आहोत. येत्या २३ डिसेंबर रोजी सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होईल. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ याची सांगता होईल. शाईफेक करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजद व पत्रकार गोविंद वाकडे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी, औरंगाबाद येथे एका कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. असे विधान केल्यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचं विविध स्तरावरून विरोध होत असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. चंद्राकांत पाटील पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. शाईफेक करणारे मनोज गरबडे, विजय होवाळ, आकाश इजद यांच्यावर गंभिर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर बंदोबस्तात असणाऱ्या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर चित्रीकरण करणारे पत्रकार गोंविद वाकडे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली होती. आता याच लोकांची सांगली येथे हत्तीवर मिरवणूक काढली जाणार आहे.
ADVERTISEMENT
