अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सुकर होणार? शेलार-फडणवीसांमध्ये मध्यरात्री चर्चा

मुंबई तक

• 02:09 AM • 17 Oct 2022

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप निवडणुकीतून माघार घेऊ शकतं, अशी शक्यता फडणवीस-शेलार यांच्या भेटीमुळे व्यक्त केली जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंना पाठिंबा […]

Mumbaitak
follow google news

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीनंतर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप निवडणुकीतून माघार घेऊ शकतं, अशी शक्यता फडणवीस-शेलार यांच्या भेटीमुळे व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋतुजा लटकेंना पाठिंबा जाहीर करत अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती फडणवीसांना केली. त्यानंतर शरद पवारांनीही हीच भूमिक मांडली. शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईकांनी अशीच भूमिका घेत शिंदेंना पत्र लिहिलंय. त्यामुळे भाजप निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. भाजपनं माघार घेतल्यासं ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सुकर होईल.

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक प्रचाराच्या सुरूवातीलाच रंगतदार अवस्थेत पोहोचलीये. अंधेरीची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवल्यानंतर भाजपकडून उमेदवार मागे घेतला जाण्याची शक्यता निर्माण झालीये. त्याला कारण ठरलं रविवारी समोर आलेल्या भूमिका.

अंधेरी पोटनिवडणूक : भाजपवर माघार घेणार? प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र

रविवारी (१६ ऑक्टोबर) राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवत असून, ती बिनविरोध व्हावी. भाजपनं निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी फडणवीसांना केली. त्यावर गांभीर्यानं विचार करू असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर घेतलेल्या भूमिकेचा दाखला दिला. त्यानुषंगाने अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन त्यांनी सर्व पक्षांना केलं.

‘घ्यायचा तर घ्या, नाहीतर सोडून द्या’, फडणवीसांना पत्र लिहिण्याचं राज ठाकरेंनीच सांगितलं कारण

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या या भूमिकानंतर ऋतुजा लटके यांनी बिनविरोध निवडून द्या, अशी भूमिका शिंदे गटातूनच मांडली गेली. आमदार प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना तसं पत्र लिहिलं.

अंधेरी पोटनिवडणूक : आशिष शेलार-देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा

अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करावी, असं प्रताप सरनाईक पत्रात म्हणाले. सरनाईकांनी शिंदेंना पाठवलेलं पत्र समोर आल्याच्या काही तासानंतर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार या भाजपच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची बैठकी झाली.

‘ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण…’, ठाकरेंनी मानले पवारांचे आभार, राज ठाकरेंबद्दल मौन

आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेतच, पण शेलारांनीच सर्वात आधी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. तर शेलारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन चर्चा केली. मध्यरात्री झालेल्या या चर्चेनंतर भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांची नजर लागलीये.

देवेंद्र फडणवीसांनी काय मांडलेली आहे भूमिका?

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली भूमिका. राज ठाकरेंच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अशा प्रकारच्या भूमिका यापूर्वी घेतलेल्या आहेत. राज ठाकरेंच्या विनंती गांभीर्यानं विचार करू. त्यासाठी मला पक्षातील नेत्यांशी चर्चा करावी लागेल, असं सांगत त्यांनी तसे संकेत दिले होते. त्यानंतर रात्री शेलारांशी त्यांची चर्चा झाली. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता वाढलीये.

    follow whatsapp