Mansukh Hiren Murder Case : पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे सेवेतून बडतर्फ

संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या मनसुख हिरेन आणि अँटीलिया बाँब प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. मनसुख हिरेन यांच्या हत्येत विनायक शिंदेचा सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे. आतापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे, रियाज काझी यांनाही बडतर्फ करण्यात आलं आहे, सध्या हे दोन्ही NIA च्या […]

Mumbai Tak

सौरभ वक्तानिया

• 03:40 PM • 24 May 2021

follow google news

संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या मनसुख हिरेन आणि अँटीलिया बाँब प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. मनसुख हिरेन यांच्या हत्येत विनायक शिंदेचा सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे.

हे वाचलं का?

आतापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे, रियाज काझी यांनाही बडतर्फ करण्यात आलं आहे, सध्या हे दोन्ही NIA च्या कस्टडीत आहेत. विनायक शिंदे हा लखनभय्या बनावट चकमक प्रकरणात अटकेत होता. काही महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. विनायक शिंदे हा सचिन वाझेसाठी बार मालकांकडून हप्ते गोळा करायचा…तसेच ज्या दिवशी मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्यात विनायक शिंदेचा सहभाग असल्याचा NIA ला संशय आहे.

सुरुवातीला मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसने विनायक शिंदे आणि एका बुकीला अटक केली होती. यानंतर अँटीलिया बाँब प्रकरणापाठोपाठ मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIA कडे सोपवण्यात आला. सध्या विनायक शिंदे NIA च्या कस्टडीत आहे.

    follow whatsapp