बिहारचा वचपा भाजपने ईशान्येत काढला : नितीशकुमारांचा अख्खा पक्षच संपवला…

इटानगर : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) पक्षाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपला धक्का देवून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले होते. भाजप प्रादेशिक पक्ष संपवत आहे, त्यामुळे भाजपसोबतची युती तोडावी अशी सर्व आमदार आणि खासदारांची मागणी होती, असा दावा नितीशकुमार यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांना […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:02 PM • 25 Aug 2022

follow google news

इटानगर : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) पक्षाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपला धक्का देवून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले होते. भाजप प्रादेशिक पक्ष संपवत आहे, त्यामुळे भाजपसोबतची युती तोडावी अशी सर्व आमदार आणि खासदारांची मागणी होती, असा दावा नितीशकुमार यांनी केला होता.

हे वाचलं का?

त्यानंतर आता भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये नितीशकुमार यांना मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमधील जेडीयुच्या उरलेल्या एकमेव आमदारानेही आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता २०१९ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या जेडीयुचे सर्व आमदार आता भाजपवासी झाले आहेत.

होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

२०१९ च्या विधानसभा अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयुने १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी त्यांचे ७ आमदार निवडून आले होते. त्यापैकी ६ आमदारांनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपचा झेंडा हातात घेतला होता.

त्यानंतर जेडीयूचे उरलेले एकमेव आमदार टेची कासो यांनी बुधवारी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष टेसम पोंगटे यांनी आमदार कासो यांचे भाजपतील प्रवेशासंदर्भातील पत्र स्वीकारुन ते मंजूर केले आहे.

‘सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसली;’ सुषमा अंधारेंनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवरून बरंच सुनावलं

दरम्यान, कासो यांच्या प्रवेशानंतर ६० सदस्यीय विधानसभेत भाजपचे संख्याबळ ४९ वर पोहचले आहे. तर सत्ताधारी आमदारांची संख्या ५५ वर गेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप सरकारला नॅशनल पीपल्स पक्षाच्या ४ आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. शिवाय २ अपक्षांचाही पाठिंबा आहे.तर विरोधात आता केवळ काँग्रेसचे ४ आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे १ असे ५ आमदार आहेत.

    follow whatsapp