फॉक्सकॉन-वेदांतांच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे सध्या शिंदे फडणवीस सरकारविरोधात विरोधक आरोप करत आहेत. अजित पवार हे मागच्या दोन दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहण्यास मिळत आहेत. अशात देवेंद्र फडणवीस यांनी आज अजित पवारांकडे खूप वेळ आहे असं म्हणत आपल्या खास शैलीत त्यांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
‘मला चुलत्याची (शरद पवार) सवय लागली, आता काय करू?’; अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची ‘झोप’च काढली
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
अद्याप राज्यातल्या १२ ते १५ मंत्र्यांनी पदभारच स्वीकारलेला नाही असा आरोप अजित पवारांनी केला. त्याबाबत विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार यांच्याकडे खूप वेळ आहे. ते आरोप करत बसतील मी उत्तर द्यायचं असं थोडंच आहे? त्यामुळे मी याबाबत काही बोलणार नाही” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास खोचक शैलीत अजित पवारांना उत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की विरोधकांना कुठलीही माहिती नसते. माहिती न घेता ते बोलत असतात. ज्यांना माहिती नाही अशा आरोपांना मी काय उत्तर देणार?. फॉक्सकॉनबाबत जे काही आरोप केले जात आहेत त्याबाबतही देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी कालच याचं सविस्तर उत्तर दिलं आहे. त्यावर रोज काय बोलायचं?
नांदेडमध्ये धक्काबुक्की झाली का? यावर काय म्हणाले फडणवीस?
नांदेडमध्ये तुम्हाला धक्काबुक्की झाली का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला माहित नाही कोणते मीडियावाले तिथे होते. कुठेही धक्काबुक्की झालेली नाही. लाठीचार्ज झाला नाही. मी त्या विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की लवकरच पोलीस भरती केली जाईल, त्यानंतर तिथून निघालो. मी तुम्हाला विनंती करतो की खोट्या बातम्या दाखवू नका.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
राज्य सरकारमधल्या सुमारे १२ मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातल्या दालनात कार्यभारच स्वीकारलेला नाही. हे काय कारणं देतात? ज्यांना जे पद हवं होतं ते मिळालं नाही त्यामुळे नाराजी आहे. पितृपक्षाचं कारण देत आहेत. जग कुठे चाललं आहे आणि यांचा कारभार पितृपक्षामुळे अडला असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
