‘जे ओवेसीला जमलं नाही, ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं’; श्रद्धा वालकर प्रकरणावरून शेलारांनी ठाकरेंना घेरलं

भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या जागर मुंबईच्या अभियानाची सहावी सभा आज बोरिवलीत झाली. यावेळी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे, शरद पवारांपासून ते जावेद अख्तर यांच्यापर्यंत अनेकांना सवाल केला. बोरिवलीतल्या जागर मुंबईच्या सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरेजी, तुम्ही मुख्यमंत्री होतात. त्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:18 PM • 17 Nov 2022

follow google news

भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या जागर मुंबईच्या अभियानाची सहावी सभा आज बोरिवलीत झाली. यावेळी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे, शरद पवारांपासून ते जावेद अख्तर यांच्यापर्यंत अनेकांना सवाल केला.

हे वाचलं का?

बोरिवलीतल्या जागर मुंबईच्या सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरेजी, तुम्ही मुख्यमंत्री होतात. त्या काळात जे झालं, ते सर्व राज्यानं पाहिलं. म्हणून आम्ही मांडतोय. अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पहिल्यांदा असं झालं की, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव बसवला. त्यानंतर शंभर वर्षात पहिल्यांदा झालं. लालबागचा राजा सुद्धा एकवर्ष बसला नाही. परंपरा खंडित झाली. सरकारमध्ये बसलेल्या उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, लालबागचा राजा बसवू नका. अरे जे अकबरुद्दीन ओवेसीला जमलं नाही, ते उद्धवजींनी करून दाखवलं”, असं आशिष शेलार म्हणाले.

श्रद्धा वालकर प्रकरणावरून आशिष शेलार शरद पवारांना काय म्हणाले?

“ज्या घरामध्ये तरुण मुलगी आहे ते घर आज अस्वस्थ आहे. आफताब नावाचा नराधम तिचे ३५ तुकडे करतो. तो तिचे धड कापून फ्रीजमध्ये ठेवतो. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही, पण सवाल हा आहे की, मृत्युमुखी श्रद्धा झाली पण मारणारा आफताब होता? हाच प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून उभा करणारे शबाना आझमी, मेधा पाटकर, जावेद अख्तर, शरद पवार, राहुल गांधी, मेधा पाटकर यांची बोबडी बंद पडली आहे”, अशा शब्दात शेलारांनी निशाणा साधला.

Shraddha Murder Case : घरभाडे करार ते पाण्याचं बिल… 5 व्यक्तींचे जबाब आफताबला अडकवणार!

“हा लव्ह जिहाद आहे. मुस्लिम मुलं हिंदू मराठी मुलींना पळवून नेवून असे नराधम कृत्य करतात. लांगूलचालन आणि तुष्टीकरण वाढल्यावर हेच चित्र होते. आमचा सवाल आदित्य ठाकरे यांना आहे? तुम्ही याचा निषेध का नाही केला? का आंदोलन केले नाही? श्रद्धा हिंदू आहे म्हणून की आफताब मुसलमान आहे म्हणून.. तो होवू नये पण दुर्दैवाने कुठल्या मुस्लिम मुलीचा खून झाला असता तर या देशातील सगळे गळे काढत उभे राहिले असते. हिंदू आणि मराठी मुलीचा खून झाल्यानंतर उद्धव ठाकरे निषेधाचा सूर काढत नाहीत कारण त्यांना मुस्लिम मताची गरज आहे. आफताबला फाशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुस्लिम मतासाठी शिवसेनेने मौन बाळगले आहे”, असं म्हणत शेलारांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.

    follow whatsapp