पोलीस कर्मचाऱ्याचा खून करुन मृतदेह शेजारील पडीक घरात पुरला, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Crime News : झडतीदरम्यान दिवेकर यांचा मोबाइल फोन पलंगाखाली आढळून आला. तसेच घरालगतच्या पडीक जागेत ताजी उकरलेली माती दिसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष खोदकाम सुरू केले. सायंकाळी सुमारे 6.30 वाजता त्या ठिकाणी पुरलेला नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar Crime News

Chhatrapati Sambhajinagar Crime News

मुंबई तक

05 Jan 2026 (अपडेटेड: 05 Jan 2026, 08:35 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलीस कर्मचाऱ्याचा खून करुन मृतदेह शेजारील पडीक घरात पुरला

point

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Crime News , शिऊर ,वैजापूर : देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह शेजारील पडीक घरात पुरल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील बळ्हेगावात उघडकीस आली आहे. नानासाहेब रामजी दिवेकर (वय 48) असे मृत पोलिस नाईकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

पोलिसाचा मोबाईल पलंगाखाली सापडला अन् उकरलेली माती दिसल्याने संशय बळावला 

प्राप्त माहितीनुसार, नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी येथे पोलिस नाईक म्हणून सेवा बजावत होते. ते छत्रपती संभाजीनगर येथील पडेगावातून रोज ये-जा करत असत. 1 जानेवारीपर्यंत ते नियमितपणे कर्तव्यावर होते. त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी ते मूळगावी बळ्हेगाव येथे आले. 2 जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. दोन दिवस उलटूनही वडील घरी परतले नाहीत आणि फोनही बंद लागत असल्याने त्यांच्या मुलाने बळ्हेगावच्या सरपंचांकडे चौकशी सुरू केली. सरपंचांनी गावात माहिती घेतली असता, नानासाहेब 2 जानेवारी रोजी गावी आल्याचे समजले; मात्र त्यानंतर ते कुठे गेले याबाबत कुणालाही ठोस माहिती मिळाली नाही. संशय बळावल्याने त्यांच्या मुलाने शिऊर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रविवारी दुपारी शिऊर पोलिसांनी बळ्हेगावातील संबंधित घराची झडती घेतली. झडतीदरम्यान दिवेकर यांचा मोबाइल फोन पलंगाखाली आढळून आला. तसेच घरालगतच्या पडीक जागेत ताजी उकरलेली माती दिसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष खोदकाम सुरू केले. सायंकाळी सुमारे 6.30 वाजता त्या ठिकाणी पुरलेला नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नात्यातील तिघांना ताब्यात; कारणांचा शोध सुरू

नातेवाइकांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी मयताच्या नात्यातील तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला की अन्य काही कारण आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. मृतदेह तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री सुमारे 9.30 वाजता अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिऊर पोलीस करीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? मुंबईत मराठीच महापौर', राज ठाकरेंचा भाजपला करडा सवाल अन्...

    follow whatsapp