पुण्यातला रिक्षा प्रवास महागला, दीड किलोमीटरच्या प्रवासासाठी द्यावं लागेल ‘एवढं’ भाडं

मुंबई तक

• 02:36 PM • 14 Oct 2021

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य माणसाचं कंबरडं आणखीनच मोडलेलं आहे. यात पुणेकर नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यातल्या रिक्षा भाड्यामध्ये आता वाढ झाली आहे. दीड किलोमिटरच्या प्रवासासाठी पुणेकर नागरिकांना आता १८ ऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत. ८ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होणार असून प्रवासी भाड्यात झालेली दोन रुपयांची भाडेवाढ ही सामान्य माणासचं […]

Mumbaitak
follow google news

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य माणसाचं कंबरडं आणखीनच मोडलेलं आहे. यात पुणेकर नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यातल्या रिक्षा भाड्यामध्ये आता वाढ झाली आहे. दीड किलोमिटरच्या प्रवासासाठी पुणेकर नागरिकांना आता १८ ऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत.

हे वाचलं का?

८ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होणार असून प्रवासी भाड्यात झालेली दोन रुपयांची भाडेवाढ ही सामान्य माणासचं रोजचं आर्थिक गणित बिघडवण्यासाठी पुरेशी ठरु शकते. ही भाडेवाढ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या तिन्ही क्षेत्रांसाठी लागू असणार आहे. पुणे परिवहन कार्यालयातर्फे याबद्दलची माहिती देण्यात आली.

पुणे,पिंपरी चिंचवड आणि बारामती या भागात 90 हजारावरून अधिक रिक्षाचालक आहेत. सतत पेट्रोल दरामध्ये वाढ होत असल्याने, रिक्षाच्या भाडे दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. आज अखेर त्यावर निर्णय झाला आहे. सध्या सुरुवातीच्या दीड किलोमीटरला 18 रुपये दर आकारला जात आहे. या भाड्यात आता दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दीड किलोमिटर नंतरच्या प्रवासाला सध्या 12.19 रुपये आकारले जात आहेत.त्यामध्ये 81 पैशांची वाढ करून 13 रुपये आकारले जाणार आहे.

    follow whatsapp