अमरावती : बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ

–धनंजय साबळे, अमरावती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या रिद्धपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनेचा निषेध केला. नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला. घटनेनंतर गावात तणावर पसरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने आंबेडकरी जनतेला शांतता पाळण्याचं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:33 AM • 04 Mar 2022

follow google news

धनंजय साबळे, अमरावती

हे वाचलं का?

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या रिद्धपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनेचा निषेध केला. नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.

घटनेनंतर गावात तणावर पसरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने आंबेडकरी जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, अज्ञात विटंबना करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना दिली.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शीरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रिद्धपूर या गावात काही अज्ञात समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकिस आला. या प्रकारानंतर संतप्त आंबेडकरी समुदायाने रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध केला.

यावेळी रस्त्यावर टायरची जाळपोळ केली तसेच तोडफोड करण्यात आल्याचीही माहिती आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला. तातडीने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

आंदोलकांनी गावातील रस्त्यावर काटे टाकून रस्ते बंद केले आहेत. निषेध नोंदवताना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दाखल झाले आहेत.

    follow whatsapp