Crime News : महिलेनं एका पुरुषाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मोठ्या टोळीचा हात असून पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी 37 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित प्रकरणात महिलेनं लाखो रुपये उकळले आणि खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली, असा पुरुषाने आरोप केला. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 19 वर्षीय तरुणीचा गल्लीतल्या अल्पवयीन मुलावर अपहरण करुन अत्याचार, कोणाला सांगू नये म्हणून धमक्याही दिल्या
या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, इंद्रनगर येथील रहिवासी मनीष गंगवार यांच्या तक्रारीवरूनच ही कारवाई केली. या प्रकरणी प्रेमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, दरम्यान आरोपी महिलेचं नाव पूजा शर्मा असे आहे.
महिलेनं संबंध ठेवून 10 लाखांची मागणी केली, नंतर बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली
या प्रकरणात पीडिताने आरोप केला की, महिलेनं त्याच्याशी जवळचे संबंध निर्माण केले होते आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करत 10 लाख उकळले. तिने खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देखील दिली होती, तसेच 12 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप करण्यात आला.
तरुणीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला
कारवाई सुरु असताना पोलिसांनी शनिवारी सकाळी 10:20 वाजता वीर सावरकर नगर येथील रहिवासी असलेली तरुणी पूजा शर्माला अटक केली. या तपासादरम्यान महिलेने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. तिने सांगितलं की, पतीसोबत कौटुंबिक वादामुळे तिला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते, याच कारणास्तव तिने एकमेकांशी डिल करण्याच्या हेतूने पैसे घेतले.
हे ही वाचा : पुरुषाने केले दोन लग्न, दुसऱ्या बायकोच्या मुलाचा एक लाख रुपयांत केला सौदा... वडील मुलाच्या नात्याला काळीमा
पोलिसांनी तिच्या एक मोबाईल फोन जप्त केला, आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तिच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
ADVERTISEMENT











