बायकोला साधूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले, नवऱ्याने कुऱ्हाडीने वार करत साधूला संपवले; 'अशी' लावली मृतदेहाची विल्हेवाट

Haridwar Sadhu Murder Case : एका साधूचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ब्रजेश दास असं या साधूचं नाव असून हरिद्वारमधील रविदास आश्रमाचे ते प्रचारक होते. त्यांचा खून करुन कृष्णा नदीत मृतदेह फेकून देण्यात आला होता. अनैतिक संबंधातून ही हत्या घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या मृत साधूचे कोणासोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांची हत्या कोणा केली, जाणून घेऊया.

Haridwar Sadhu Murder Case

Haridwar Sadhu Murder Case

मुंबई तक

17 Feb 2026 (अपडेटेड: 17 Feb 2026, 02:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोला साधूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले

point

नवऱ्याने कुऱ्हाडीने वार करत साधूला संपवले

point

नेमकं प्रकरण काय?

Haridwar Sadhu Murder Case : एका साधूचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ब्रजेश दास असं या साधूचं नाव असून हरिद्वारमधील रविदास आश्रमाचे ते प्रचारक होते. त्यांचा खून करुन कृष्णा नदीत मृतदेह फेकून देण्यात आला होता. अनैतिक संबंधातून ही हत्या घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या मृत साधूचे कोणासोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांची हत्या कोणा केली, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : इस्त्राईलच्या महिलेवर कर्नाटकात बलात्कार, मित्राला कालव्यात बुडवून मारलं, हॉटेल मालकीणीसोबतही दुष्कृत्य, आता न्यायालयाचा मोठा निर्णय

बायको आणि साधू आक्षेपार्ह अवस्थेत

रविदास आश्रमाचे प्रचारक आणि साधू ब्रजेश दास हे 5 फेब्रुवारी 2025 पासून बेपत्ता होते. 10 फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांनी केलेला शेवटचा कॉल आणि मोबाईलचे लोकेशन यावरुन त्यांच्या खून्याला शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागपत जिल्ह्यातील गांगनौली गावात त्यांचे शेवटचे लोकेशन आढळले.  तेथील शशी नावाच्या महिलेशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. पोलिसांनी शशीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. शशी ही ब्रजेश दास यांची नातेवाईक होती आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. 5 फेब्रुवारी रोजी ब्रजेश दास तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. यावेळी दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत असतानाच शशीचा पती संजीव अचानक तिथे पोहोचला.

कुऱ्हाडीने वार करुन भीषण हत्या

आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहून संतप्त झालेल्या संजीवने रागाच्या भरात कुऱ्हाड उचलली आणि ब्रजेश दास यांच्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, ब्रजेश दास यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संजीवने आपला भाऊ जोगेंद्र याच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्यांनी मृतदेह उचलून जवळच असलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिला.

हे ही वाचा : बीड: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद; थेट तिघांवर चाकूने हल्ला अन् एक ठार...

पोलिसांची कारवाई आणि अटक

उत्तराखंड पोलिसांनी सर्व्हिलन्स आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर या गुन्ह्याचा छडा लावला. नदीपात्रातून साधूचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजीव, त्याची पत्नी शशी आणि मेहुणा जोगेंद्र या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून, पोलीस आता या घटनेतील पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
 

    follow whatsapp