Crime News : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका 25 वर्षीय तरुणावर त्याच्या प्रेयसीच्या दोन लहान भावांनी जीवघेणा हल्ला केला. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्जिकल ब्लेडने आरोपींनी तरुणाचा गळा चिरला. महेंद्र कनोजिया असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधील ही घटना आहे. सुदैवाने कुटुंबियांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महेंद्रचे प्राण वाचले असून त्याच्या गळ्यावर 18 टाके पडले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं, पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली
लग्नाच्या चर्चेदरम्यान हल्ला
महेंद्र कनोजिया हा व्यवसायाने शटरिंगचे काम करतो. त्याचे 27 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. महेंद्रच्या कुटुंबीयांनी लग्नाची चर्चा करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या तरुणीला आपल्या घरी बोलावले होते. चर्चा सुरु असतानाच तरुणीचे दोन लहान भाऊ शिवम गौतम आणि अनुराग गौतम अचानक तिथे पोहोचले. त्यांनी अचानक महेंद्रवर हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी महेंद्रला जमिनीवर पाडले आणि सर्जिकल ब्लेडने त्याच्या गळ्यावर वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घरात एकच खळबळ उडाली.
प्रसंगावधानामुळे जीव वाचला
महेंद्रचे वडील संतोष आणि काका रमेश यांनी जीवाची पर्वा न करता दोन्ही हल्लेखोरांना पकडले आणि त्यांच्या हातातील ब्लेड हिसकावून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत महेंद्र बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याच्या जखमेवर 18 टाके घातले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. महेंद्रच्या मोठ्या भावाच्या सासरच्या गावातून या प्रेमसंबंधांची सुरुवात झाली होती, मात्र मुलीच्या कुटुंबाचा या नात्याला तीव्र विरोध होता.
हे ही वाचा : गरोदर बायकोचा मृतदेह घरात ठेवून नवऱ्याने पळ काढला, आई रक्ताच्या थारोळ्यात असताना चिमुकली मिठी मारुन बसली
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम आणि अनुराग या दोन्ही भावांना अटक करुन कारागृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घटनेत वापरलेले सर्जिकल ब्लेड जप्त करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











