Crime News: एकतर्फी प्रेमाला वैतागून एका महिलेने तरुणाची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना ही मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात घडली असून आरोपी महिलेने तिच्या आई-वडिलांसोबत मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, बैतूल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या भैंसदेहीच्या कौडिया गावात एका महिलेने तिच्या आई-वडिलांसह महाराष्ट्रातील एका तरुणाची हत्या केली आणि त्याची ओळख लपवण्यासाठी त्याचा मृतदेह शेतात पुरला.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
कौडिया गावातील बिसराम साल्वे यांच्या घरासमोर एक बेवारस दुचाकी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही घटना उघडकीस आली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, पोलीस तपासासाठी आले तेव्हा बिसराम साल्वे घरातून गायब होते, त्यांची पत्नी सोनाय साल्वे पोलिसांना उत्तरे देण्यासाठी टाळाटाळ करत होती आणि त्यांची मुलगी सुमित्रा तिच्या मुलांसोबत सातनेरला निघून गेली होती. त्यांचं वागण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची कठोर चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: महिलेच्या वेशात आत शिरला अन् तरुणाने आपल्याच मेहुणीचा गळा चिरला... नेमकं प्रकरण काय?
चौकशीदरम्यान समोर आलं की मृत शिवम धुर्वे (28) हा महाराष्ट्रातील रहिवासी असून तो सुमित्राच्या ओळखीचा होता. मात्र, त्याची सुमित्रावर वाईट नजर होती. आरोपी सुमित्रा विवाहित असून ती दोन मुलांची आई होती. तसेच, तिचा पती महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. सुमित्राच्या आरोपानुसार, शिवम तिला बऱ्याच काळापासून त्रास देत होता आणि तिला सतत धमकवायचा. त्यामुळे कंटाळून सुमित्राने त्याला 13 फेब्रुवारी रोजी तिच्या आईवडिलांच्या घरी बोलवलं. शिवम घरी आल्यानंतर, सुमित्राने तिच्या आईवडिलांसोबत मिळून त्याचे हातपाय दोरीने बांधले आणि त्याला जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: लातूर : पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतीगृहासमोर रक्ताचा सडा, विद्यार्थ्याची हत्या; चौघांवर धारदार शस्त्रांनी वार
हत्येनंतर, आरोपींनी पुरावे मिटवण्याच्या उद्देशाने जवळच्या शेतात खड्डा खणून त्यात त्याचा मृतदेह पुरला. मात्र, गुन्हा लपवण्याच्या घाईत आरोपी त्यांच्या घरासमोर उभी असलेली बाईक ठिकाणी लावण्यास विसरले आणि त्यामुळेच ते पकडले गेले.
ADVERTISEMENT











