संगीतकार बप्पी लहरींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, डिस्को किंगला अखेरचा निरोप

संगीतकार बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन झालं आहे. डिस्को बिट्सवर लोकांना थिरकायाला लावणारे बप्पीदा यांचा मृत्यू झाल्याची बातमी कालच आली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकाहून एक सरस हिंदी गाणी देणारे आणि डिस्को हा प्रकार हिंदीत रूजवणारे बप्पी लहरी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:54 AM • 17 Feb 2022

follow google news

संगीतकार बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन झालं आहे. डिस्को बिट्सवर लोकांना थिरकायाला लावणारे बप्पीदा यांचा मृत्यू झाल्याची बातमी कालच आली. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकाहून एक सरस हिंदी गाणी देणारे आणि डिस्को हा प्रकार हिंदीत रूजवणारे बप्पी लहरी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आज बप्पी लहरींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांचा मुलगाही मुंबईत आला आहे.

हे वाचलं का?

बप्पी लहरींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये राहतो. तो रात्री उशिरा मुंबईत दाखल झाला आहे. बप्पा असं त्यांचं नाव आहे. आज बप्पी लहरींना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक तारे-तारकांनी उपस्थिती दर्शवली होती.

डिस्को किंग बप्पी लहरी यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या पवन हंस या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पहाटे तीनच्या सुमारास बप्पा लहरी म्हणजेच बप्पीदांचा मोठा मुलगा जुहू येथील आपल्या घरी आला आहे. बप्पी लहरी यांच्या जाण्याने लहरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बप्पा लहरी हे वडील बप्पी लहरी यांच्या अत्यंत जवळचे होते. आपल्या वडिलांनाच ते आदर्श मानत होते. या दोघांमधलं नात दोन चांगल्या मित्रांसारखं होतं. इंस्टाग्रामवर बप्पा लहरी हे आपल्यासह वडिलांचे फोटो शेअर करत होते. बप्पी लहरींना बप्पा लहरी हे कायम बॉस फॉरएव्हर असं म्हणत.

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली.

बप्पीदा सोन्याचे दागिने का घालत?

तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेस्ली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असं बप्पीदांनी सांगितलं होतं. आता बॉलिवूडचा हा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

    follow whatsapp