Tauktae Cyclone मध्ये अडकलेलं ‘ते’ जहाज बुडालं, 177 जणांची सुटका; 96 जणांचा शोध सुरुच

मुंबई तक

• 01:17 PM • 18 May 2021

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने काल (17 मे) मुंबईच्या समुद्रात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. याच वादळात खोल समुद्रात एक मोठं जहाज अडकलं आणि त्यात होते तब्बल 273 जण. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने तब्बल 177 जणांना मोठ्या कठीण परिस्थितीतून वाचवलं आहे. पण अद्यापही 96 जणांचा शोध सुरु आहे. नौदलाचे आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता ही जहाजं बचाव […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने काल (17 मे) मुंबईच्या समुद्रात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. याच वादळात खोल समुद्रात एक मोठं जहाज अडकलं आणि त्यात होते तब्बल 273 जण. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने तब्बल 177 जणांना मोठ्या कठीण परिस्थितीतून वाचवलं आहे. पण अद्यापही 96 जणांचा शोध सुरु आहे. नौदलाचे आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता ही जहाजं बचाव कार्य करत आहे.

हे वाचलं का?

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन नेवल P8I सर्विलान्स एअरक्राफ्टच्या मदतीने बचावकार्य सध्या सुरु आहे. तसेच नौदलाचे हेलिकॉप्टर देखील या कामात मदत करत आहेत. आज (मंगळवार) या बचाव कार्यची गती वाढवली जाईल आणि सर्च ऑपरेशन जारी राहील.

बेफाम लाटा, बेलगाम वारा… तरीही बहाद्दरांनी वाचवले शेकडो जीव; समुद्रातील थराराची कहाणी

मात्र, अद्यापपर्यंत 177 जणांचीच सुटका झाली असून 96 जणांचा शोध सुरु आहे. गेल्या 24 तासापासून नौदलाचे जवान हे सलगपणे या बचावकार्यात गुंतले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार Barge P305 ही बोट बुडाली आहे. ज्यापैकी 182 जण सुखरुप परतले असून 96 जण मात्र अद्याप सापडू शकलेले नाहीत. याशिवाय इतर Barge Gal Constructor या बोटीवरील 137 जणांची सुटका करण्यात आली आहे.

आपल्या बचावकार्यादरम्यान, नौदलाने सांगितलं की, एक मोठी नौका (Barge 305) ही भर मध्य समुद्रात अडकली होती आणि ज्यामध्ये 273 जण होते. त्यातील 177 जणांना वाचविण्यात आलं आहे. याशिवाय कुलाब्यानजीक आणखी एक बोट अडकली होती. ज्यामध्ये 137 लोक होते. त्यांना वाचविण्यासाठी देखील नौदलाची एक तुकडी पाठविण्यात आली होती.

हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची देखील वेळोवेळी मदत घेतली जात आहे. तौकताई चक्रीवादळ हे आता गुजरातमध्ये धडकलेलं असलं तरीही अद्याप समुद्र खवळलेलाच आहे. त्यामुळे बचाव कार्यात काही अडचणी येत आहे.

70 वर्षात असं कधीही घडलं नव्हतं, मुंबईतील चक्रीवादळाचा नेमका इतिहास काय?

तौकताई चक्रीवादळाचं रौद्र रुप

तौकताई या चक्रीवादळाने मुंबईत ताशी 100 किमी प्रति वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे मुंबईच्या नजीक असणारा समुद्र चांगलाच खवळला होता. त्यामुळे पहिल्यांदाच समुद्राचं रौद्र रुप यावेळी पाहायला मिळत होतं. या वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची बरीच पडझड झाली. तर अनेक ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालं आहे.

हवामान खात्यातील एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, सोमवारी मुंबईत मुसळधार पावसासह जवळजवळ ताशी 120 किमी प्रति वेगाने वारे वाहत असल्याची देखील नोंद हवामान खात्याने केली आहे. दरम्यान, मुंबईत याबाबतचा अलर्ट आधीच जारी करण्यात आला होता.

    follow whatsapp