बीड: मटणावरुन राडा, दोघांनी मटण विक्रेत्याला बेदम चोपलं

मुंबई तक

28 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:00 AM)

Beed Crime over Meat: बीड: बीडमध्ये (Beed) कधी कोणत्या कारणावरुन भांडण होईल हे सांगता यायचं नाही. असंच एक भांडण हे चक्क मटणावरुन (Meat) झालं आहे. चांगलं मटण का दिलं नाही? म्हणून मटण विक्रेत्याला दोन जणांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (beed […]

Mumbaitak
follow google news

Beed Crime over Meat: बीड: बीडमध्ये (Beed) कधी कोणत्या कारणावरुन भांडण होईल हे सांगता यायचं नाही. असंच एक भांडण हे चक्क मटणावरुन (Meat) झालं आहे. चांगलं मटण का दिलं नाही? म्हणून मटण विक्रेत्याला दोन जणांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (beed crime a meat seller was brutally beaten up by two persons for not providing good quality meat)

हे वाचलं का?

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे मटण का चांगले दिले नाही म्हणून दोन जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करत मटण विक्रेत्याला गंभीर दुखापत केली आहे. एवढ्यावरच न थांबता दोन्ही आरोपींनी मटण विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

वडील मटण खायला घालत नाही म्हणून मुलाकडून टोकाचं पाऊल, कुऱ्हाडीने वार करत केली हत्या

याप्रकरणी जहीर वलिमिया खुरेशी यांच्या फिर्यादीवरून गावातीलच जब्बार खुरेशी आणि मोहसीन खुरेशी या दोघांवर कलम 324, 223, 504, 506, 34 भादंविनुसार बर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाला असला तरीही अद्यापही दोन्ही आरोपींनी अटक करण्यात आलेली नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

भिवंडी : मटण कापायच्या सुरीने पत्नीवर वार करत हत्या, तळ्यात उडी मारुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

फक्त मटण चांगले दिले नाही म्हणून जी बेदम मारहाण करण्यात आली त्या घटनेची सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा सुरु आहे

दरम्यान, अशाप्रकारच्या अनेक घटना या बीडमध्ये सातत्याने घडत आहेत. त्यामुळे बीडमध्ये कायद्याचा धाक कुणालाच राहिलेला नाही का? असा सवाल यावेळी विचारण्यात येत आहे. त्यामुळेच अशा प्रकारे कायदा मोडणाऱ्यांवर बीड पोलीस काय कारवाई करणार किंवा कायद्याचा धाक कायम राहावा यासाठी नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे बीड पोलीस हे बीडकरांच्या टार्गेटवर आले आहेत.

    follow whatsapp