Beed Crime News : बीड शहरात खुलेआम गुंडाराज सुरू असल्याचं अनेक घटना पुन्हा पुन्हा दाखवून देत आहेत. काल वाल्मिकच्या बातम्या का पाहतो म्हणून संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या ओळखीच्या तरूणानं एकाला मारहाण केली होती. त्यानंतर आता पुन्हा एक घटना समोर आली आहे. चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला करुन एका तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ADVERTISEMENT
बीडमध्ये असलेल्या मोमिनपुरा परिसरात दिवसाढवळ्या ही घटना घडली. ही मारहाण करतानाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मोहम्मद खलील राशिद या तरुणावर नजीब खान उस्मान खान आणि खिजर खान शरीफ खान या दोघांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. मोहम्मद खलील राशिद याला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला 3 टाके पडले आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >>बीडमध्ये हे चाललंय तरी काय? वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला तुफान मारहाण
विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी आणि जखमी तरूण हे एकमेकांच्या घराजवळच राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोर रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरूनच आरोपींनी हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, 19 जानेवारी 2025 रोजी हॉटेल शालीमारमध्ये घडलेला हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा >>Palghar : शिकार करायला गेले आणि रानडुक्कर समजून आपल्याच दोन साथीदारांना गोळ्या...
बीड शहरात खुलेआम गुंडाराज आणि वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार का? कायद्याचा धाक आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
ADVERTISEMENT











