Sanjay Raut । Bhaskar Jadhav । Gulabrao Patil : संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून विधानसभा आणि विधान परिषदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याच्या चर्चेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात वार पलटवार बघायला मिळाला. (Bhaskar Jadhav And Gulabrao Patil speech in Assembly)
ADVERTISEMENT
संजय राऊतांवर हक्कभंग आणण्यात आला. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी मत मांडलं. “या सभागृहात, या सभागृहाच्या प्रतिष्ठेबद्दल, या सभागृहाच्या सन्मानाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कुणी करावं की करून नये, यापेक्षा करू नये. जर कुणी अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, तर या सभागृहाची उच्च परंपरा जी आहे, त्या परंपरेनुसार काही निर्णय झालेले मान्य करू शकतो.”
“ज्यावेळी सभागृहात हा विषय आला, त्यावेळी मी सभागृहात नव्हतो. मी उशिरा आलो. मी विषयाची माहिती घेतली, पण तो कोणत्या टिपेला पोहोचलाय, कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे, याची माहिती नसल्यामुळे मी शांतपणे बसलो होतो”, असं भास्कर जाधव म्हणाले.
“संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून उल्लेख केला आणि आम्हाला उचकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी आपल्याला बोलण्याची परवानगी मागितली. या सभागृहाचा अपमान, सभागृहाबद्दल गैरउद्गार काढणं, केवळ कुणाला तरी परवानगी आहे आणि कुणाला तरी मान्यता आहे असं मानता येणार नाही”, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली.
Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग
एकनाथ शिंदेंच्या विधानावर बोट, भास्कर जाधव काय म्हणाले?
भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. जाधव म्हणाले, “यानिमित्ताने मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. नियमाप्रमाणे, प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे विरोधी पक्षाला चहापानाला बोलावलं जातं, आम्ही त्या चहापानाला गेलो नाही. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही बोलले. आम्ही देशद्रोही आहोत का? याचाही खुलासा व्हायला हवा”, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
“हे मुख्यमंत्री अडीच वर्षे मांडीला मांडी लावून बसले होते. ते आम्हाला देशद्रोही बोलणार. बाहेरच्या सदस्याने वक्तव्य केल्यानं जर इतका कांगावा करत असाल, तर सभागृहातील नेत्याने आम्हाला देशद्रोही म्हणाले”, असं भास्कर जाधव विधानसभेत म्हणाले.
Maharashtra Budget Live: भाजप-सेना खवळलीआक्रमक
गुलाबराव पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्त्र, भास्कर जाधवांना दिलं उत्तर
गुलाबराव पाटील म्हणाले, “सभागृहात चालेल्या चर्चेला भास्कर जाधव वेगळं वळण देत आहेत. या सभागृहाला चोर म्हणायचं. 41 चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेत जायचं. या चोरांनी त्यांना मतं दिली. आता परवाचं मार्मिकचं चित्र बघा. दाढीवाला कबूतर तुम्ही मुख्यमंत्र्यांचं चित्र काढता. अमित शाहांचं चित्र काढता. ही कोणती परिस्थिती आहे?”, असा सवाल त्यांनी केला.
“संजय राऊतांनी कुणालाही डिवचायचा ठेका घेतला आहे का? ही कोणती अवलाद आहे की, काही बोलेल आणि काही करेल? या सभागृहाची गरिमा आहे. या सभागृहात आम्ही लोकांच्या मतावर आलोय. यांच्यासारखे मागच्या दरवाज्याने आलेलो नाहीये”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
‘कशाला असले धंदे करता? किमान डोकी तरी चालवा’, अजित पवार विधानसभेत भडकले
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली; गुलाबराव पाटील राऊतांवर बरसले
“यांनी तर शिवसेनेची वाट लावली. तुम्ही 16 ची वाट लावणार आहात, काळजी करू नका तुम्ही. ज्यांनी उद्धव साहेबांना उल्लू केलं. 35-35 वर्ष तपस्या करणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढलं, या माणसाने सगळ्या शिवसेनेचा सत्यानाश केला. तो माणूस आज आम्हाला चोर म्हणतो. या सभागृहाला चोर म्हणतो”, अशी टीका पाटील यांनी राऊतांवर केली.
“बार मालकांच्या सरदाराप्रमाणे संजय राऊत यांच्यावर कारवाई करा”
गुलाबराव पाटील म्हणाले, “अध्यक्षांना माझी विनंती आहे की, ज्याप्रमाणे बार मालकांच्या सरदारावर कारवाई झाली. ती कारवाई संजय राऊतांवर केली गेली पाहिजे. या सभागृहाचा अपमान आहे. कोण सभासद, कोणत्या पक्षाचा आहे तो? आपण चार-चार लाख लोकांमधून निवडून येतो. चोर नाहीये. भास्करराव चोर नाहीये. टपरीवरून निवडून आलेले लोक आहोत.”
“जनमतातून निवडून आलेले लोक आहोत आपण. संजय राऊतांना चोर म्हणण्याचा अधिकार नाही. उलट या चोराने आमची मतं घेतली आहेत. त्यांना गरिमा राखायची असेल, तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे आणि आपण कारवाई करावी”, अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली.
ADVERTISEMENT
