ST Strike बाबत सर्वात मोठी बातमी, गोपीचंद पडळकर आणि खोतांची माघार, आंदोलनाचा निर्णय कामगारांवर सोडला!

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनबात मोठी घोषणा केली आहे. आझाद मैदानावर जे आंदोलन त्यांनी पुकारलं होतं. त्यातून त्यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, यावेळी सदाभाऊ खोत आणि […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:47 AM • 25 Nov 2021

follow google news

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनबात मोठी घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

आझाद मैदानावर जे आंदोलन त्यांनी पुकारलं होतं. त्यातून त्यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, यावेळी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी असंही जाहीर केलं की, आंदोलन सुरु ठेवायचं की, मागे घ्यायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यावा.

‘एसटी कर्मचाऱ्यांची जी विलिनीकरणाची मागणी ती योग्यच आहे. त्याबाबत जो काही न्यायालयीन लढा सुरु असेल त्यात आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. मात्र, सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.’

‘त्यामुळे आम्ही आझाद मैदानात जे आंदोलन पुकारलं होतं ते मागे घेत आहोत. पण असं असलं तरी महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे.’ असही खोत, पडळकर यावेळी म्हणाले.

‘कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू केलं जावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. गेले 15 दिवस हे आंदोलन सुरु होतं. अखेर काल सरकारला जाग आली. त्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला. हा कर्मचाऱ्यांचा पहिला विजय आहे. हा पहिला टप्पा आहे.

‘ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 17 हजार रुपये आहे त्यांना 24 हजार पगार मिळणार आहे. तसंच ज्यांना 23 हजार पगार मिळतोय त्यांना 28 हजार पगार मिळेल. ही वाढ मूळ वेतनातील आहे.’ असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी एक प्रकारे कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

    follow whatsapp