भाजपचे सहयोगी आमदार अग्रवाल यांची वीज अभियंत्याला मारहाण : तक्रारीनंतर माफीनामा

मुंबई तक

• 01:28 PM • 30 Aug 2022

गोंदिया : गोंदियाचे भाजपचे सहयोगी आमदार विनोद अग्रवाल-कर्मचारी यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचे पहायला मिळाले. थकित वीज बिलाची सक्तीने वसुली का करता असा जाब विचारायला गेलेले आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणाचा उपकार्यकारी अभियंताला मारहाण केल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे. मारहाणीनंतर संतप्त झालेले सर्व कर्मचारी आमदार अग्रवाल यांची तक्रार करण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्यामध्ये पोहचले. पण प्रकरण अंगलटी […]

Mumbaitak
follow google news

गोंदिया : गोंदियाचे भाजपचे सहयोगी आमदार विनोद अग्रवाल-कर्मचारी यांच्यातील वाद चांगलाच रंगल्याचे पहायला मिळाले. थकित वीज बिलाची सक्तीने वसुली का करता असा जाब विचारायला गेलेले आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणाचा उपकार्यकारी अभियंताला मारहाण केल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे.

हे वाचलं का?

मारहाणीनंतर संतप्त झालेले सर्व कर्मचारी आमदार अग्रवाल यांची तक्रार करण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्यामध्ये पोहचले. पण प्रकरण अंगलटी येत असल्याचे बघून आमदार अग्रवाल यांनी एक पाऊल मागे घेवून संबधित कर्मचाऱ्याची माफी मागवून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

नेमके काय घडले?

मुर्री येथील लारोकर नामक ग्राहकाचे थकीत वीज बिल अनेक दिवसांपासून थकले होते. हेच बिल वसूल करण्यासाठी महावितरणाचे अधिकारी लारोकर यांच्या घरी धडकले होते. दरम्यान लारोकर यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना मदत मागितली. मतदारसंघातील मतदाराला मदत करण्याच्या नादात आमदार महोदयांनीही सूर्याटोला येथील पॉवर हाऊस गाठत उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांना जाब विचारला.

जयंत पाटलांसमोरच अमोल मिटकरींची नाचक्की : थेट जिल्हाध्याकडून कमिशनखोरीचा आरोप

दरम्यान, अधिकाऱ्याला जाब विचारत असतानाच आमदार महोदयांचा तोल जावून त्यांनी राजेश कंगाले यांना थेट मारहाण केली. शासकीय काम करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची ही बातमी संपूर्ण कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आमदार विनोद अग्रवाल यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी रामनगर पोलिस ठाणे गाठले. वाढता कर्मचारी दबाब व रात्रीच्या वेळी जमा होत असलेल्या कर्मचाऱ्याची गर्दी लक्षात घेत रामनगर पोलिसांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार नोंदवून घेतली.

आमदार बांगर अन् खासदार पाटील यांना पुन्हा गुलाल नाही : नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची शपथ

ही माहिती आमदार महोदयांना समजताच त्यांनी थेट रामनगर पोलिस ठाणे गाठून मारहाण झालेल्या संबंधित अभियंत्याची जाहीर माफी मागितली. आमदारांच्या माफीनाम्यानंतर संबंधित उपकार्यकारी अभियंत्याने देखील मोठ्या मनाने तक्रार मागे घेतली. याबाबत आमदार महोदयांनी आपण कोणाला मारहाण केली नसल्याचे बोलले खरे, मात्र त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली हे देखील तितकेच खरे.

    follow whatsapp