उपजिल्हाधिकारी भरती घोटाळ्यानंतर दुसऱ्यांदा ACB च्या सापळ्यात

मुंबई तक

29 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:00 AM)

जका खान, प्रतिनिधी (बुलढाणा) बुलढाणा : वादग्रस्त उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आणि त्यांच्या २ सहकाऱ्यांना पुन्हा एकदा लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. भिकाजी घुगेंसोबत कार्यालयीन लिपीक नागेश खरात आणि मध्यस्थ अॅड अनंता देशमुख यांच्यावर एक लाखांची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. पद आणि लाचेची रक्कम बघता २०२२ मधील बुलढाणा जिल्ह्यातील […]

Mumbaitak
follow google news

जका खान, प्रतिनिधी (बुलढाणा)

हे वाचलं का?

बुलढाणा : वादग्रस्त उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आणि त्यांच्या २ सहकाऱ्यांना पुन्हा एकदा लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. भिकाजी घुगेंसोबत कार्यालयीन लिपीक नागेश खरात आणि मध्यस्थ अॅड अनंता देशमुख यांच्यावर एक लाखांची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. पद आणि लाचेची रक्कम बघता २०२२ मधील बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन प्रकल्पासाठी संपादित केली जाते अशा शेतकऱ्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून मोबदला दिला जातो. बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव प्रकल्पात हिंगणे इच्छापूर येथील एका शेतकऱ्याची दीड एकर जमीन भूसंपादित करण्यात आली होती. या जमिनीचा मोबदलाही राज्य सरकारकडून जमा झाला. मात्र वडिलांचा मृत्यू झाला आणि मोबदल्याची रक्कम महसूल खात्याकडून नजरचुकीने ‘रविंद्र’च्या जागी ‘राजेंद्र’ होऊन तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली.

सदरची रक्कम परत मिळविण्यासाठी आणि चूक दुरुस्त करण्यासाठी मध्यम प्रकल्प कार्यालय उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी एकूण मोबदल्याचे १० टक्के अर्थात २ लाखांची मागणी केली. यासाठी अॅड अनंता देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतची तक्रार मिळाली. एसीबीने २८ डिसेंबरला सापळा रचून मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, लिपिक नागेश खरात यांच्यासाठी १ लाखाची लाचेची रक्कम स्वीकारतांना अॅड अनंता देशमुख यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाई नंतर पथकाने घुगे आणि खरात यांनाही ताब्यात घेतलं.

घुगे यापूर्वीही तीन वेळा ठरले होते वादग्रस्त :

भिकाजी घुगे यांना २०१४ मध्ये उस्मानाबादला जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत होते, तेव्हा १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उस्मानाबाद एसीबी पथकाने पकडले होते. नांदेड मध्ये असताना महिला कर्मचाऱ्याला अपशब्द वापरल्याने घुगेंना चोप देण्यात आला होता. तसेच नांदेडमध्येच २००७-२००८ मध्ये महसूल कर्मचारी भरतीप्रकरणी गैप्रकाराच्या तक्रारी वाढल्याने विभागीय चौकशीनंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. 

    follow whatsapp