Shivsena Symbol : ठाकरे गटाचा पाठपुरावा सुरुच! शिंदे गटही दिल्ली उच्च न्यायालयात

मुंबई तक

• 01:12 PM • 10 Oct 2022

दिल्ली : शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवण्याचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहचला आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप करत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने न्यायालयाकडे केली आहे. ही याचिका सोमवारी दुपारी दाखल करुन घेण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे […]

Mumbaitak
follow google news

दिल्ली : शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवण्याचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहचला आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप करत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी ठाकरे गटाने न्यायालयाकडे केली आहे. ही याचिका सोमवारी दुपारी दाखल करुन घेण्यात आली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, ठाकरे गटाची याचिका दाखल होताच शिंदे गटानेही आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दिल्ली उच्च न्यायालयात ठाकरेंच्या याचिकेवर कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर निर्णय देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने न्यायालयाला केली आहे.

काय म्हटले आहे उद्धव ठाकरेंच्या याचिकेत?

नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही ठाकरे गटाने केली आहे. यासोबत आपल्या तीन पर्यायी चिन्हांना संरक्षण मिळावे ही मागणीही याचिकेद्वारे केली आहे. आमच्या विचारसरणीशी निगडित चिन्ह फ्री सिम्बॉल यादीत नाही. पण आम्हाला चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच पर्याय दिले आहेत असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवर अनिल देसाई काय म्हणाले?

निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करता धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं. घाईघाईत सर्व निर्णय घेतले. या सर्व गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यात काहीतरी हस्तक्षेप करेल, अशी आशा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली.

ठाकरे गटाचा पाठपुरावा :

शिंदे गटाकडून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे का प्रश्न सध्या विचारला जात आहे. कारण जी तीन चिन्ह ठाकरे गटाकडून देण्यात आली, त्यातील दोन चिन्ह म्हणजे उगवता सुर्य आणि त्रिशूळ ही चिन्ह शिंदे गटाने दिली. सोबत ठाकरे गटाकडून देण्यात आलेले शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नावही शिंदे गटाने दिले. आता ठाकरेंच्या याचिकेवरही शिंदे गटाने कॅव्हेट दाखल केले आहे.

    follow whatsapp