Crime News : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय. लौरिया तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या चिमुकल्यावर झालेला अमानवी अत्याचार हा केवळ एक गुन्हा नसून, समाजाच्या अपयशाचं प्रतीक आहे. केवळ आठ रुपयांचे आमिष दाखवून एका निष्पाप बालकाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कारण केवळ 8 रुपयांचे अमिष दाखवत एका पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, रविवारी संध्याकाळी नागाव येथील एका गावातील गौरीशंकर साह यांचा मुलगा विनोद साह (20) याने त्याच भागातील एका पाच वर्षांच्या मुलाला आठ रुपये देऊन आमिष दाखवले आणि शेतातील एका बागेत नेले. त्यानंतर त्याने तिथेच त्या निष्पाप मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने मुलाला त्याच्या घराच्या जवळ सोडून दिले आणि पळून गेला. जेव्हा कुटुंबीयांनी मुलाला विचारपूस केली, तेव्हा त्याने रडत रडत आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, जिथे डॉ. अफरोज आलम यांनी प्रथमोपचार केले आणि त्यानंतर त्याला बेतिया जीएमसीएचमध्ये पाठवले. या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस अधिकारी रमेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळताच आरोपीला अटक केली आहे. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याची चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट, शिक्षेलाही स्थिगिती
या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होतो की, इतक्या लहान वयातील मुलं सुरक्षित आहेत का? घराच्या आसपास, ओळखीच्या व्यक्तींमुळेच अशा घटना घडत असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. बालक अजून योग्य-चूक समजण्याच्या अवस्थेत नसताना, त्याच्यावर होणारा असा अत्याचार त्याच्या मानसिक आणि शारीरिक आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करतो. बालवयात झालेल्या लैंगिक अत्याचाराचे दुष्परिणाम आयुष्यभर राहू शकतात. अशा मुलांमध्ये भीती, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव आणि सामाजिक अलगाव वाढतो. काही वेळा हे मानसिक आघात पुढे जाऊन गंभीर आजारांचे कारणही ठरतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणं अपुरं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली असली, तरी अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं, त्यांच्याशी संवाद ठेवणं आणि ‘चांगला स्पर्श-वाईट स्पर्श’ याबाबत वयानुसार माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. मुलं घाबरून न जाता आपल्यावर घडलेली घटना मोकळेपणाने सांगू शकतील, असं वातावरण घरात आणि शाळेत तयार होणं आवश्यक आहे. पश्चिम चंपारणची ही घटना एक इशारा आहे. कायदे आहेत, शिक्षा आहेत; पण समाज जागरूक नसेल, तर निष्पाप बळी जात राहतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











