अकोल्यातील कठोर लॉकडाऊनच्या नियमात ‘हे’ बदल

मुंबई तक

• 12:36 PM • 04 Mar 2021

अकोला: अकोल्यात उद्यापासून (5 मार्च) लॉकडाऊनमध्ये बदल करण्यात आले असून आता नवे नियम लागू केले जाणार आहेत. यावेळी लॉकडाऊनसंबंधी नियमात काही बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता अकोला जिल्ह्यात सर्व व्यवहार हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सूट असणार आहे. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे लॉकडाऊनबाबतच्या आदेशात […]

Mumbaitak
follow google news

अकोला: अकोल्यात उद्यापासून (5 मार्च) लॉकडाऊनमध्ये बदल करण्यात आले असून आता नवे नियम लागू केले जाणार आहेत. यावेळी लॉकडाऊनसंबंधी नियमात काही बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता अकोला जिल्ह्यात सर्व व्यवहार हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सूट असणार आहे. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे लॉकडाऊनबाबतच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही राज्य सरकारसाठी चिंताजनक ठरत आहे. अमरावती आणि अकोला या भागांमध्ये जिल्हा प्रशासनाने १ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली होती. परंतू रुग्णसंख्येत होत असलेली वाढ अजुनही कमी होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर व जवळच्या प्रतिबंधित क्षेत्रात ८ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे येथील व्यापाऱ्यांना नुकसान होत होतं. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सर्व व्यवसाय पुन्हा सुरु व्हावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार आता अकोलाच्या जिल्हाधिकऱ्यांनी लॉकडाऊनबाबतचे काही नियम शिथील केले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व दुकानं बंद होती. तसेच या काळात नियमांचा भंग करणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. मात्र, आता या नियमात काहीसे बदल करण्यात आल्याने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अकोल्यात सात दिवसांनी लॉकडाउन वाढवलं, रुग्णसंख्येत वाढ कायम

मात्र, असं असलं तरीही सर्व व्यापारी, दुकानदार आणि कर्मचारी यांच्या कोव्हिड टेस्ट या निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. ज्या दुकानदारांच्या कोव्हिड चाचण्या निगेटिव्ह असणार आहेत त्यांनाच दुकानं उघडण्याची परवानगी असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

अकोल्यातील नेमकी स्थिती काय?

२० फेब्रुवारीनंतर अकोल्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून आलं होतं. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भातला पॉजिटीव्हीटी रेटही १० टक्क्यांच्या वर पोहचला होता. त्यामुळे ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अकोला आणि प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. दरम्यान, अकोल्यात आतापर्यंत 16,747 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 386 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3915 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात अकोल्यात 439 नवे रुग्ण आढळले आहेत.

    follow whatsapp