भांडूप येथील रूग्णालयाला लागलेल्या आगी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असे निर्देश दिले आहेत. कोव्हिड रूग्णांच्या उपचारासाठी जी रूग्णालयं सुरु आहेत तेथील अग्नी सुरक्षेची तपासणी तातडीने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. यासंदर्भातल ज्यांनी दुर्लक्ष आणि दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाईल असंही आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रूग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेत ज्या दहा जणांचा बळी गेला त्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मृतांच्या कुटुंबीयांची माफीही मागितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भांडूपमध्ये येऊन घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
काय घडली घटना?
मुंबईतील भांडुप येथे ड्रीम मॉलमध्ये रात्री 11.30 च्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे. याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज नावाचं एक हॉस्पिटल आहे. जिथे 70 हून अधिक रुग्ण दाखल होते. यामधील सर्वाधिक रुग्ण हे कोरोना व्हायरसवर उपचार घेणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार ज्या 10 जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे ते सर्व रुग्ण होते.
सनराईज रूग्णालयाला कोरोना हॉस्पिटल म्हणून ३१ मार्चपर्यंत संमती देण्यात आली होती. या मॉलमध्ये असलेल्या दुकानांना आग लागली आणि ती आग रूग्णालयातपर्यंत पोहचली आणि ही दुर्घटना घडली.
ADVERTISEMENT
