कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात केलं दाखल

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे राजू श्रीवास्तवला दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांचा भाऊ आणि पीआरओ यांनी राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक आल्याची माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक कसा आला? कॉमेडियन राजू श्रीवास्तव हॉटेलमध्ये वर्क आऊट करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना राजू श्रीवास्तव यांना छातीत दुखू […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:21 AM • 10 Aug 2022

follow google news

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे राजू श्रीवास्तवला दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांचा भाऊ आणि पीआरओ यांनी राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक आल्याची माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक कसा आला?

कॉमेडियन राजू श्रीवास्तव हॉटेलमध्ये वर्क आऊट करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना राजू श्रीवास्तव यांना छातीत दुखू लागलं. त्यानंतर राजू श्रीवास्तव खाली पडले. या घटनेनंतर लगेचच राजू श्रीवास्तव यांना रूग्णालयात नेण्यात आलं. राजूचे पीआरओ अजित सक्सेना यांनी सांगितलं की राजू श्रीवास्तव हे दिल्लीत काही राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी आले होते. सकाळी जिममध्ये वर्क आऊट करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या बाबत समोर आलेल्या बातमीमुळे त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. लवकरच त्यांना आराम मिळावा यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत तसंच उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे ते चेअरमनही आहेत.

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या खास प्रकारच्या अनोख्या कॉमेडी शोजसाठी ओळखले जातात. राजू श्रीवास्तवला लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं. राजूने काही सिनेमांमध्येही भूमिका केल्या आहेत. राजूने त्याचं करिअर स्टेज शोच्या माध्यमातूनच सुरू केलं होतं.

राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक आल्याची बातमी समोर आली तेव्हा चाहते खूपच चिंतित झाले. राजू श्रीवास्तव यांचा एक खास प्रेक्षक वर्ग आहे. उत्तम कॉमेडी टायमिंगसाठी राजू ओळखला जातो. राजू श्रीवास्तवने अनेक स्टेज शो केले आहेत. तसंच त्याच्या कॅसेट्स आणि सीडीजही प्रसिद्ध आहेत. अनेक टीव्ही शोजमध्येही राजू श्रीवास्तव झळकला आहे. सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे.

    follow whatsapp