काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…50 खोके पक्के; काँग्रेस आमदाराचा शहाजीबापूंना टोमणा?

मुंबई तक

• 09:20 AM • 03 Jul 2022

मुंबई: आज आणि उद्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. आज पहिला दिवस पार पडला, यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सर्वात तरुण वयात विधानसभेच्या अध्यक्षपदी बसले आहेत. मागच्या काही काळापासून राज्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. या राजकीय संघर्षात चर्चेचा विषय ठरला तो शहाजीबापू पाटलांची व्हायरल ‘कॉल रेकॉर्डींग. काय झाडी, काय […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: आज आणि उद्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. आज पहिला दिवस पार पडला, यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सर्वात तरुण वयात विधानसभेच्या अध्यक्षपदी बसले आहेत. मागच्या काही काळापासून राज्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. या राजकीय संघर्षात चर्चेचा विषय ठरला तो शहाजीबापू पाटलांची व्हायरल ‘कॉल रेकॉर्डींग. काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल सगळं ओक्केमध्ये हाय’ हा डायलॉग अतिशय फेमस झाला.

हे वाचलं का?

आजच्या अधिवेशनात देखील या डायलॉगची चर्चा होती. सभागृहात शिरगणती सुरु असताना शहाजीबापू (Shahaji Bapu Patil) मतदानाला उठले आणि सदस्यांनी काय झाडी, काय डोंगरचा गजर केला. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सर्वजण बाहेर पडत होते, त्यामध्ये काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी शहाजीबापूंचा डायलॉग म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ”काय झाडी. काय डोंगर, काय हाटेल…50 खोके पक्के झाले” असे म्हणत कैलास गोरंट्याल यांनी शहाजीबापूंना नाव न घेता टोला लगावला आहे.

जाणून घ्या सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या राहुल नार्वेकरांविषयी

कालही ज्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईमध्ये आले तेव्हा ते ताज हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले. तिथेही शहाजीबापूंच्या डायलॉगची चर्चा होती. शहाजीबापूंना पाहताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एवढेच नाहीतर शहाजीबापूंनी थेट चंद्रकांत पाटलांचे पाय धरले. आज सर्व बंडखोर आमदार विधान भवनात हजर होते, त्यांनी सर्वांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप काढला होता तर शिंदे गटाच्यावतीनेही व्हीप काढला होता. आता व्हीप कोणाचा खरा हे ११ तारखेला समजणार आहे. त्यामुळे आज अधिवेशन आणि अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असली तरी अजून सरकारच्या बाबतीत कायदेशीर लढाई बाकी आहे.

    follow whatsapp