Shirdi: साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, ‘या’ स्वामीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

01 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:04 AM)

Controversial statement about Shirdi Saibaba: शिर्डी: शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांबद्दल (Saibaba) एका यूट्यूब चॅनलवर गिरिधर स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं. जाती-धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचं वक्तव्य केल्याने शिर्डी येथील माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी गिरीधर स्वामी व इतर दोन व्यक्तींविरुद्ध शिर्डी पोलिसात (Shirdi Police) तक्रार दिल्यानंतर आता सर्वांविरोधात गुन्हाही दाखल […]

Mumbaitak
follow google news

Controversial statement about Shirdi Saibaba: शिर्डी: शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांबद्दल (Saibaba) एका यूट्यूब चॅनलवर गिरिधर स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं. जाती-धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचं वक्तव्य केल्याने शिर्डी येथील माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी गिरीधर स्वामी व इतर दोन व्यक्तींविरुद्ध शिर्डी पोलिसात (Shirdi Police) तक्रार दिल्यानंतर आता सर्वांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. (controversial statement about shirdi saibaba case filed against giridhar swamy)

हे वाचलं का?

याबाबत पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले कि, दिव्य दुनिया गिरीधर स्वामींनी ‘साईबाबा कौन थे’ या मुद्द्यावर एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना अभद्र वक्तव्य केलं होतं. त्यांच्याविरुद्ध तसेच कार्यक्रमाचे आयोजक हिरालाल श्रीनिवास काबरा ( हैदराबाद ) माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.’

गिरिधर स्वामी, आयोजक हीरालाल काबरा यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये IPC 153 A, 295 A, 298, 34 अन्वये गुन्हा दखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

फिर्यादी शिवाजी गोंदकर यांनी सांगितले की, ‘श्री साईबाबांबद्दल दिव्य दुनिया नावाच्या यूट्यूब चॅनलवर गिरिधर स्वामी नावाच्या व्यक्तीने अत्यंत खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी केली आहे. ज्या भाषेचा वापर साईबाबांबद्दल त्यांनी केला तो अत्यंत चुकीचा आहे. त्याचा मी निषेध करतो.’

शिर्डी : साईबाबा मंदिर ट्रस्टला तब्बल 175 कोटी रूपयांच्या आयकरातून सूट

गिरीधर स्वामीने साईबाबांबाबत जी काही विधानं केली आहेत त्याला कुठेही आधार नाही. गिरीधर स्वामींकडून साईबाबांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने सोशल मीडियात साईबाबांबद्दल खोटी व बदनामीकारक विधाने केली जात आहेत. म्हणून मी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गिरीधर स्वामी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शिर्डीत या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच आता गिरीधर स्वामीविरुद्ध नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp