मुंबईत ७५ वर्षीय व्यावसायिकाने ३५ वर्षीय लेखिकेवर केला बलात्कार

मुंबई तक

16 Jun 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:04 AM)

मुंबईतल्या जुहू या भागातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ७५ वर्षांच्या एका व्यावसायिकाने ३५ वर्षे वयाच्या लेखिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी ३७६ (2), ५०४ भादवि कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यावसायिकाने महिलेला याची वाच्यता केलीस तर याद राख मी डी कंपनीला म्हणजेच […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या जुहू या भागातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ७५ वर्षांच्या एका व्यावसायिकाने ३५ वर्षे वयाच्या लेखिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी ३७६ (2), ५०४ भादवि कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

या व्यावसायिकाने महिलेला याची वाच्यता केलीस तर याद राख मी डी कंपनीला म्हणजेच दाऊदला सांगेन ही धमकीही दिली. यानंतर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दाऊदचं नाव पुढे आल्यानं पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. दाऊद म्हटल्यावर खंडणी, हत्या, जिवे मारण्याचा प्रयत्न हे गुन्हेच समोर येतात. मात्र बलात्कारासारख्या गुन्ह्यात पहिल्यांदाच डी कंपनीचं नाव पुढे आलं आहे.

मुंबईत १९ वर्षांच्या महिलेवर तीन महिने सामूहिक बलात्कार, खळबळजनक घटना उघड

३५ वर्षांच्या पीडित लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दादरमधे वास्तव्य करणाऱ्या व्यावसायिकाने द ऑन टाईम नावाच्या पंचतारांकित हॉटेलात नेत तिच्यावर बलात्कार केला. या व्यावसायिकाने दोन कोटी रूपये व्याजाने घेऊन ते परत न केल्याचाही दावा केला होता. या पैशांकरता त्याने मला त्रास दिलाच तसंच हॉटेलवर नेत बलात्कार केला असंही या पीडित महिलेने म्हटलंय.

त्या व्यावसायिकाने मला दाऊदच्या नावाने धमकी दिल्याचंही या पीडित महिलेने सांगितलंय. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केलं आहे.

मुंबईत १५ तारखेलाही उघड झाली सामूहिक बलात्काराची घटना

मुंबईतल्या कुर्ला या उपनगरात एका १९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये महिलेच्या बहिणीच्या नवऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणातल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे.

पीडित महिला ही मूळची कोलकाता येथील आहे. काही महिन्यांपूर्वी ती मुंबईत आली होती. त्यावेळी तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला कुर्ला या ठिकाणी एका खोली मालकाकडे नेलं. त्या भागात काही भिकारीही भाडे तत्त्वावर घर घेऊन राहात होते. याच घरातल्या भिकाऱ्यांकडून पैसे घेऊन पीडित महिलेच्या भावोजीने पीडित महिलेला त्यांच्या स्वाधीन केलं. एवढंच नाही तर पीडित महिलेच्या बहिणीच्या नवऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला.

    follow whatsapp