tv actress sanchita ugale dies by suicide : वसईच्या नालासोपारा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री संचिता उगाले हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून, एका तरुण अभिनेत्रीने अचानक जीवन संपवल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संचिताने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले, याचे गुपित अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'मी भवानीला मारुन टाकलं', एक कॉल आला अन् बॉयफ्रेंडही बेशुद्ध अवस्थेत तिथेच सापडला
संचिताची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
विशेष म्हणजे, संचिताच्या निधनापूर्वीची तिची सोशल मीडियावरील सक्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आत्महत्या करण्याच्या अवघ्या 20 तासांपूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती 'डफलीवाले डफली बजा' या प्रसिद्ध गाण्यावर अतिशय आनंदाने डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिचे हास्य आणि तिचा आनंद पाहून तिने काही तासांतच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : पंढरपुरातील आंदोलनावेळी Rohit Pawar यांचा परिवार भावूक, पत्नी कुंती यांच्यासह मुलंही रडली
घटनेची माहिती मिळताच आचोले पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संचिताचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. संचिताच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलीस तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत. तिच्या मृत्यूने संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
छावा सिनेमातही केलं होतं काम
संचिताने साजन घर, कुमकुम भाग्य, वागळे की दुनिया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. कुमकुम भाग्य या मालिकेतील दिया टंडन या भूमिकेमुळे तिला घराघरांत ओळख मिळाली होती. संचिता आपल्या मालिका आणि चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखली जात होती. तिने Vicky Kaushal यांच्या Chhaava या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात ती ताराबाई यांच्या भूमिकेत दिसली होती.
ADVERTISEMENT











