15 वर्षीय मुलाने पैसे चोरले, दारुच्या नशेत बाप बनला राक्षस, काय घडलं?

मुंबई तक

• 09:11 AM • 28 Sep 2026

वडिलांनी आपल्या 15 वर्षांच्या मुलावर चोरीचा आरोप करत त्याला दोरीने बांधले आणि बांबूने मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात घडली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

15 वर्षीय मुलाने पैसे चोरले

point

दारुच्या नशेत बाप बनला राक्षस

point

काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका दारूच्या नशेत असलेल्या बापाने आपल्याच 15 वर्षांच्या मुलाला खांबाला बांधून बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी बापाने मुलाचा मृतदेह खाटेवर ठेवला आणि तो तेथून पसार झाला. ही घटना 21 सप्टेंबर रोजी पूर्वा सोमवंशी गावात घडली असून रिशू उर्फ इशू असे मृत मुलाचे नाव आहे.

हे वाचलं का?

खांबाला बांधून मारहाण अन् तडफडून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिता उम्मेद सिंह याचे त्याच्या मुलासोबत चोरीच्या पैशांवरून वारंवार भांडण होत असे. घटनेच्या रात्री उम्मेद सिंह दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी त्याची मोठी मुले गणेश पूजा आणि कीर्तनासाठी गेली होती. घरी लहान मुलगा रिशू आणि लहान बहीण हजर होते. जुन्या वादातून संतापलेल्या उम्मेद सिंहने रिशूला दोरीने खांबाला बांधले आणि बांबूच्या काठीने त्याला अत्यंत क्रूरपणे मारण्यास सुरुवात केली. यात गंभीर जखमी झालेल्या रिशूचा तडफडून मृत्यू झाला.

हे ही वाचा : मुंबई : सार्वजनिक शौचालयात घडलं भयंकर, दोन तरुणांचा मृत्यू, 'तो' वायू नेमका आला कुठून?

मारहाण करुन झाला फरार

या प्रकरणी मृत रिशूचा मोठा भाऊ नीरज याच्या तक्रारीवरून सहार पोलीस ठाण्यात उम्मेद सिंहविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली होती. अखेर 24 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपी पिता उम्मेद सिंह याला अटक केली.

हे ही वाचा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार, तिघांच्या आवळल्या मुसक्या

पोलीस चौकशीत कबुली

पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोरी आणि बांबूची काठी जप्त केली आहे. अटक केल्यानंतर आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून पोलीस या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.