Crime News : झारखंडच्या गुमला जिल्ह्यांत एका 13 वर्षीय आदिवासी मुलीवर अज्ञातांनी अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपीने पीडितेसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. पीडित मुलगी ही तिच्या घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिला सुरूवातीला सिमडेगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती इतकी गंभीर होती की, डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर गेले होते. त्यानंतर त्या रुग्णालयाने रांची येथील रिम्स रुग्णालयात पाठवले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार, तिघांच्या आवळल्या मुसक्या
मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार
संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पालकोट पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार, गुरूवारी रात्री त्यांची मुलगी घराबाहेर बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या सामूहिक लैंगिक अत्याचार झाला आणि तिला निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, असा आरोप त्याने केला. मुलीला सुरूवातीला उपचारासाठी कोलेबिरा आणि सिमडेगा येथे दाखल करण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला गुमला येथे पाठवले.
अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल
यानंतर, गुमला येथील सदर रुग्णालयात तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला रांची रिम्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यार उपचार सुरू असतानाच, शनिवारी रिम्समध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पीडिता ही 24 सप्टेंबरच्या सायंकाळी घरातून बाहेर पडली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेर गंभीर अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी या घटनेचा तीव्र तपास केला आहे. शनिवारी, पीडितेच्या वडिलांनी पालकोट पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : पुण्यातील विश्रांतवाडीत 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 52 वर्षीय सफाई कंत्राटी कामगाराला अटक
अशातच पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय समितीला विनंती केली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे पोलीस कारवाई करतील. या प्रकरणात सर्व दुवे जोडून मुलीच्या मृत्यूमागील सत्य घटना उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांना कोणत्याही संशयिताच्या अटकेची पुष्टी केलेली नाही.
ADVERTISEMENT












